Coronavirus esakal
पुणे

सावध ऐका पुढल्या हाका!

नववर्षाची सुरुवात उत्साहाने झाली असली तरी तिला काळजीची किनार आहेच. जगभर थैमान घालणारा कोरोनाचा ओमीक्रॉन विषाणू आतापर्यंत आपल्यापासून दूर होता.

धनंजय बिजले

नववर्षाची सुरुवात उत्साहाने झाली असली तरी तिला काळजीची किनार आहेच. जगभर थैमान घालणारा कोरोनाचा ओमीक्रॉन विषाणू आतापर्यंत आपल्यापासून दूर होता.

नववर्षाची सुरुवात उत्साहाने झाली असली तरी तिला काळजीची किनार आहेच. जगभर थैमान घालणारा कोरोनाचा ओमीक्रॉन विषाणू आतापर्यंत आपल्यापासून दूर होता. पण गेल्या काही दिवसांत त्याने मुंबई, पुण्यात आपले अस्तित्व दाखवण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये पुण्याला फार मोठा फटका सहन करावा लागला आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने नऊ हजारांवर लोकांचा बळी घेतला आहे. आर्थिक हानी किती झाली याची तर मोजदादच नाही. अशा परिस्थितीत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन, महापालिका, सर्वसामान्य नागरिक सर्वांनीच वेळीच सावध होण्याची गरज आहे.

रुग्णसंख्येचा वाढता आलेख

गेल्या गुरुवारी (ता. २७) पुण्यात अवघे ७७ रुग्ण होते. मात्र चार दिवसांत रोज रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात ३९९ रुग्णांची भर पडली आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०७० वर पोहोचली आहे. कोरोनाशी दोन हात करीत ‘न्यू नॉर्मल़ जीवनशैली कशी जगायची याची माहिती आता एव्हाना प्रत्येकालाच झालेली आहे. मात्र दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आजूबाजूला कोठेही नजर टाकली तरी याचा सहज प्रत्यय येतो आहे. त्यामुळेच रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे, आणि हीच खरी काळजीची बाब आहे.

आरोग्य यंत्रणेवर ताण नको

ताप आल्यास तत्काळ चाचणी करणे, सतत मास्क वापरणे आणि लसीकरण ही त्रिसूत्री यापुढे फायदेशीर ठरणार आहे. गर्दी कमी तितका प्रसार कमी त्यामुळे सध्यस्थितीत प्रत्येकाने अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे. प्रत्येकाने मास्कसुद्धा घातलाच पाहिजे. येत्या सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरु होत आहे तर १५ तारखेपासून ज्येष्ठांना तसेच फ्रंटलाईन वकर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. सर्व पात्र व्यक्तींनी त्याच लाभ घ्यायला हवा. कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे आपण अनुभवले आहे. ऑक्सिजनची मागणी प्रमाणापेक्षा जास्त वाढली की आरोग्य यंत्रणा कोलमडते. हे टाळायचे असेल तर टेस्टिंग, मास्किंग व लसीकरण यावर भर देत आरोग्य यंत्रणेला साथ दिली पाहिजे तरच आपण संभाव्य तिसरी लाट रोखू शकणार आहोत. प्रत्येक गोष्ट शासनाने, महापालिकेने करायची असे म्हणून आता चालणार नाही. शासकीय पातळीवर जी काळजी घ्यायला हवी ती ते घेतीलच. पण संसर्गाचा प्रसार खऱ्या अर्थाने रोखायचा असेल तर समूहाची साथ महत्त्वाची असते. यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळत आपला खारीचा वाटा उचलायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT