dhananjay desai sakal
पुणे

Pune Crime : धनंजय देसाईचा जामीन अर्ज फेटाळला

जमीन नावावर करून न दिल्याने मुळशीमधील सुर्वेवाडीत एका शेतकऱ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी ‘हिंदू राष्ट्र सेने’चा अध्यक्ष धनंजय देसाई याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जमीन नावावर करून न दिल्याने मुळशीमधील सुर्वेवाडीत एका शेतकऱ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी ‘हिंदू राष्ट्र सेने’चा अध्यक्ष धनंजय देसाई याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांना हा आदेश दिला.

याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक ऑगस्टला त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देसार्इसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई याच्यावर विविध पोलिस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत.

यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा गुन्‍ह्यांचा समावेश आहे. गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना देसाई सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केला.

फिर्यादी यांच्यावतीने ॲड. अमेय बलकवडे, ॲड. सतीश कांबळे आणि ॲड. सूरज शिंदे यांनी बाजू मांडली. घटनेच्या दिवशी बलकवडे हे सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात घुसले.

जमीन धनंजय देसाई याच्या नावावर का करून दिली नाही, अशी विचारणा करून त्यांनी फिर्यादी यांना धमकावले. जमीन नावावर करून न दिल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. एका आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT