पुणे

धनश्रीचे कुटुंब सांभाळण्याचे स्वप्न राहिले अधुरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पगार वाढून मिळत असल्याने पुतणी पिरंगुटमधील एसव्हीएस कंपनीत रुजू झाली. सोमवारी तिचा कामाचा सहावाच दिवस होता. नव्या नोकरीमुळे कुटुंबाची जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळता येईल, असे तिचे स्वप्न होते. मात्र ते अधुरेच राहिले, अशी माहिती धनश्री शेलार यांचे चुलते बाजीराव शेलार यांनी दिली.

२२ वर्षीय धनश्री या एसव्हीएस कंपनीत लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्यांपैकी एक. घरातील मोठी मुलगी या नात्याने त्या नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच कुटुंबाचा खर्च भागवत होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या पिरंगुट येथे चुलते बाजीराव शेलार यांच्याकडे राहत होत्या. सहाच दिवसांपूर्वी त्या एसव्हीएसमध्ये रुजू झाल्या होत्या. एक छोटी बहीण आणि आर्इ-वडील असे धनश्री यांचे कुटुंब त्यांच्या मुळ गावी साताऱ्यात राहते. त्यांचे वडील शेती करतात. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने धनश्री यांच्या नोकरीचा त्यांना मोठा आधार होता. तसेच घराच्या निर्णय प्रक्रियेत देखील त्यांचा मोठा सहभाग असे. मात्र आता त्यांच्या कुटुंबाचा हा आधार कायमचा तुटला आहे.

शेलार यांनी सांगितले की, माझ्या मोठ्या भावाला दोन मुली आहेत. त्यातील धनश्री ही मोठी मुलगी. तिचे शिक्षण बीएससी झाले होते. कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरच होती. ती गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात माझ्याकडे राहायला होती. एसव्हीएसला जॉर्इन होण्यापूर्वी ती पौड रस्त्यावर असलेल्या एका खासगी कंपनीत कामाला होती. तिचा आधार गमावलेल्या भावासह आमच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT