Dhangar Reservation  Sakal
पुणे

Dhangar Reservation : झारगडवाडीत धनगर बांधवाकडून राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको आणि मुंडन आंदोलन

राज्यभर धनगर बांधवाकडून निषेध आंदोलने

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी : राज्य सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नसल्याच्या निषेधार्थ झारगडवाडी (ता. बारामती) येथील ग्रामस्थांनी मुंडन करून रास्ता रोको आंदोलन केले. राज्यभर धनगर बांधवाकडून निषेध आंदोलने केली जात आहेत.

एस टी चे आरक्षण मिळवण्यासाठी अहमदनगर येथील चौंडी या ठिकाणी काही धनगर बांधव गेली १५ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ पाठींबा देत बुधवारी ( ता. २०) बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून धनगर बांधवांकडून बारामती वालचंदनगर रोडवर रास्ता रोको करत मुंडन आंदोलन करण्यात आले.

यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आरक्षणाच्या अंमलबजावणीची शिफारस न करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलना दरम्यान राजेंद्र बोरकर, संघर्ष मासाळ, आप्पासाहेब कोळेकर, सतीश कुलाळ, बापूराव सोलणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आंदोलन ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी नारायण कोळेकर , दादासो बोरकर, रणजीत बोरकर,आजिनाथ बुरुंगले, गोरख बोरकर, संतोष मासाळ, प्रशांत बोरकर, प्रवीण बोरकर, नितीन मासाळ, मच्छिंद्र झारगड, राजेंद्र झारगड, अमोल बोरकर, राहुल कुलाळ, अमोल करे, गणेश बोरकर, भीमराव कोळेकर, भाऊसो करे, दादासो नरोटे, खंडेराव करे, आदी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील धनगर समाज एसटीचे आरक्षण मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत. आरक्षण मिळवण्यासाठी अहमदनगर येथील चौंडी या ठिकाणी काही धनगर बांधव गेली १५ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत यातील एका आंदोलकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मात्र अजून काही आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम असून आता त्यांनी पाणी देखील त्याग केले आहे. दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने चर्चा करून मार्ग काढावा अन्यथा चर्चा देखील बंद केली जाईल असा इशारा धनगर आंदोलनकर्त्यांकडून यावेळी राज्य सरकारला देण्यात आला आहे. यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

Ambajogai Crime: अंबाजोगाईत धक्कादायक घटना! अभ्यासिकेतून परतणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत आईला शेवटचा फोन

Nanded: ॲपेतून डिझेल वाहतुकीचा धंदा; सुरक्षा नियमांची ऐशी तैशी !, इतरांचा जीव धोक्यात

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Fifa World Cup 2026: हे नाव लक्षात ठेवा, Jonathan David! पठ्ठ्याने ९६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, १९६६चा आणखी एक पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT