डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, पिंपरी - धनगर समाजाच्या जाहीर मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उत्तम जानकर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, पिंपरी - धनगर समाजाच्या जाहीर मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना उत्तम जानकर. 
पुणे

धनगर समाजाची मते मिळणार नाहीत - जानकर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास समाजातील मतदारांचे एकही मत मिळणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार तर जाईलच, मात्र केंद्र सरकारचेही नामोनिशाण राहणार नाही,’’ असा इशारा धनगर समाजाचे अभ्यासक उत्तम जानकर यांनी रविवारी (ता. १७) येथे दिला.

धनगर समाजाच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. नागेश चित्तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली.  

जानकर म्हणाले, ‘‘आमच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याची प्रामाणिक जिद्द आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या एक हजार तरुणांना आरक्षणाच्या महत्त्वाबाबत शिक्षित केले आहे. आरक्षणाबाबत सरकारमध्ये बेइमानीची भूमिका आली आहे. आरक्षणासाठी आता फार वाट पहावी लागणार नाही. सरकारने फूट पाडण्याचे सगळे प्रयत्न करून पाहिले. मात्र त्यांना यश आले नाही. धनगर समाजाचा कोणी प्रतिनिधी सत्तेत नसेल, तर वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळे आरक्षण मिळालेच पाहिजे.’ राजेंद्र घोडके यांनी प्रास्ताविक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

SCROLL FOR NEXT