dhangekar warn strike protest in Lalit Patil drug case crime pune marathi news esakal
पुणे

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात धंगेकरांचा आंदोलनाचा इशारा

अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून आहे. मुख्य आरोपीची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारसह पोलिसांच्या विरोधात बुधवारी (ता. २९) पोलिस आयुक्तालयासोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटील प्रकरणाच्या चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळून आलेले ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त केले.

पोलिसांनी मोक्का अंतर्गत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पैशांची देवाण घेवाण करणारा त्यांचा सहकारी कर्मचारी महेंद्र शेवते यालाही अटक झालेली नाही. कारागृह प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही चौकशी झालेली नाही. या प्रकरणात ज्यांच्यावर संशय आहे, त्या सर्वांना अभय देण्याचा प्रकार सुरु आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात लक्ष घातले असते तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. ललित पाटीलने ससूनमधून ड्रग्जचा धंदा केला. यासाठी पोलिस, सरकारी अधिकारी, डॉक्टरांना कोट्यावधी रुपये वाटले आहेत, असा आरोप धंगेकर यांनी केला. पण याचा तपास होत नसल्यानेच पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार आहे, असे धंगेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT