Araneshwar Rasta Tree Collapse by Rain sakal
पुणे

Dhankawadi Rain Update : धनकवडी-सहकारनगर परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी; झाडेही पडल्याच्या घटना घटल्या

पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धनकवडी-सहकारनगर परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी, चिखल आणि झाडे पडल्याच्या किरकोळ घटना घटल्या.

सकाळ वृत्तसेवा

धनकवडी - पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धनकवडी-सहकारनगर परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी, चिखल आणि झाडे पडल्याच्या किरकोळ घटना घटल्या. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.

सलग पाऊस पडत असल्यामुळे बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोहननगर, मामा येनपुरेनगर, संभाजीनगर, तळजाई पठार आदी रस्त्यावर पाण्याचे तळे झाले आहे. तसेच धनकवडीतील बऱ्याच पार्किंग मध्ये पाणी साठत असल्याने काही सोसायटीतील नागरिकांनी नाल्यांची झाकण उघडून पाणी जाण्यास ड्रेनेज उघडे केले होते.

धनकवडीतील अतंर्गत रस्त्याचे काम सुरु असून, चंद्रभागा चौक, शिव कृष्ण मित्र मंडळ चौक समोरील मुख्य रस्ते खोदल्याने आणि ड्रेनेज ओव्हर फ्लो झाल्याने पाणी साचले होते. तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खड्डे पडले. काल रात्री पासूनच मुसळधार पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी अंतर्गत चेंबर मधून पाणी रस्त्यावर आले.

भारती विद्यापीठ परिसर त्रिमूर्ती चौक, दत्तनगर चौकाकडे जाणारा राजमाता भुयारी मार्गात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यामुळे धनकवडी परिसरात त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

धनकवडीतील कलानगर येथील खासगी शाळेची संरक्षण भिंत व आंबेगाव पठार येथील वर्धमान सोसायटीलगत सुरू असलेल्या बांधकामाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. मात्र यामुळे कोणतेही जीवितहानी झाली नाही. याबाबत माहिती मिळताच धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातर्फे तत्काळ पाहणीकरून उपाययोजना केल्या. असे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी सांगितले.

उतार असलेल्या रस्त्यावरून पाणी वेगाने खाली आल्यामुळे धनकवडीतील चैतन्यनगर येथील दुर्वांकुर क्लासिक सोसायटीच्या पार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. रस्त्यावर पावसाळी ड्रेनेज होती मात्र त्यात कचरा अडकून पाणी कायम साचते. असे सोसायटीतील नागरिक वैशाली पाटील यांनी सांगितले.

पावसामुळे सूर्या चौक आंबेगाव पठार व ट्रेझर पार्क अरणेश्र्वर रस्ता येथे झाड रस्त्यावर कोसळले होते. आपत्कालीन विभागातर्फे धोक्याच्या ठिकाणासह सर्वत्र सूचना देत असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Mumbai: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

SCROLL FOR NEXT