dhanori crime update small dispute attack on youth with sharp weapon police esakal
पुणे

Pune Crime : किरकोळ वादातून धानोरीत तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार; दोघांना अटक

किरकोळ वादातून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना धानोरी येथील मुंजाबा वस्तीमध्ये घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २८ : किरकोळ वादातून तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना धानोरी येथील मुंजाबा वस्तीमध्ये घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अनिकेत किसन कांबळे (वय १८, रा. दुर्गा ढाब्याजवळ, वडगाव शिंदे, लोहगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार भीमा उकिरडे (वय १८, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव), जुबेर अकबर शेख (वय १८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अन्य एक साथीदार पसार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि त्याचा मित्र निखिल तांबे धानोरीतील गेनबा मोझे शाळेच्या मैदानावर गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी तिघेजण रात्री पावणेबाराच्या सुमारास तेथे आले. तुम्ही येथे का बसलात, अशी विचारणा केली. त्यावरून झालेल्या वादात आरोपींनी अनिकेतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्याच्या हातावर आणि डोक्यावर हत्याराने वार केले. या घटनेनंतर पसार झालेल्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Pune Graduate election counting latest update : पुणे पदवीधर मतदार संघातील पहिली अपडेट आली समोर, लिंबू, बिबवे आढळल्याने गोंधळ

गुलाल आपलाच! मतमोजणी सुरू होताच कराळे मास्तरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाले, ४०-४५ हजार मते मिळतील

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लोकशाही भवनात मतमोजणी सुरू; १४ टेबलवर १४ हजार मतपत्रिकांची मोजणी

SCROLL FOR NEXT