Gas Cylinder Blast Sakal
पुणे

धानोरी : गॅस सिलेंडरचा स्फोट, जीवितहानी नाही

धानोरी येथील परांडेनगर येथे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.

रूपाली अवचरे

धानोरी येथील परांडेनगर येथे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे.

विश्रांतवाडी - धानोरी येथील परांडेनगर येथे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. परांडेनगर सर्व्हे न.८१/८२ लक्ष्मीनगर सोसायटी समोरच्या खोलीत हा स्फोट झालेला.स्फोटावेळी घरातील कामानिमित्त बाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही.

परंतु घरातील सर्व घरगुती सामान जळून खाक झाले. नुकसानग्रस्त घरमालक विजय कणीराम राठोड हे अपंग असून गॅस सिलेंडर स्फोटामुळे त्यांच्या संसार उघड्यावर पडला आहे. शेजारी असलेल्या खोलीमध्ये महादेव नवनाथ खिलारे यांच्यासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्यामुळे शेजारी असलेल्या इतर घरांची आगीपासून हानी झाली नाही. दुर्घटनास्थळी धानोरीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप डाळीमकर, दत्तात्रय परांडे, वाल्मिक कानसकर, शहाजी खलसे, नवनाथ कानसकर गेले असता पीडित अपंग व्यक्ती विजय राठोड यांना रडू कोसळले.

गॅस सिलेंडर स्फोटामुळे संसार जळालेल्या कुटुंबाला मदतीचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.तरी ज्याला ज्याला जी शक्य मदत असेल त्याने ती मदत देऊन पीडित कुटुंबाचा संसार पुन्हा उभारण्यास मदत करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT