पुणे

धर्म हा ‘रिलिजन’हून भिन्न

CD

उज्जैन, ता. १८ (पीटीआय) ः ‘‘भारतीयांची धर्म या संकल्पनेबाबतची धारणा आणि पाश्‍चिमात्यांची ‘रिलिजन’ ही धारणा यामध्ये फरक आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आयोजित युवा धर्म संसदेत सहभागी झालेल्या ‘जेन झीं’ना संबोधित करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. देशात विविध पंथांमध्ये भेदभाव केला जात नसून हीच खरी सहिष्णुता आहे, असेही भागवत यावेळी म्हणाले.
‘‘धर्माविषयी चर्चा करणे हे ज्येष्ठ नागरिकांचे काम असल्याचा समज सध्याच्या कालात प्रचलित असताना एवढ्या मोठ्या संख्येने युवक हे धर्माबाबत चर्चा करत असल्याचे पाहून आनंद झाला असे,’’ भागवत म्हणाले. या युवा धर्मसंसदेमध्ये सुमारे दीड हजारहून अधिक युवक सहभागी झाले होते. आपल्याकडे राज्य म्हणून जी संकल्पना आहे तीदेखील सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आहे, ती कोणामध्ये भेद करणारी नाही आणि हीच खरी पंथ निरपेक्षता आहे, असे भागवत म्हणाले. पाश्‍चिमात्यांची ‘सेक्युलरिजम’ ही संकल्पना राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या संघर्षातून उदयाला आली आहे त्यामुळे ती आपल्याकडे लागू होणारी नाही, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भौतिकता आणि अध्यात्म हे परस्परांच्या समन्वयातून पुढे जाणारे आहेत, असेही भागवतांनी सांगितले.
सुमारे ३०० विद्वान, शिक्षक, संशोधक आणि धार्मिक नेते ‘युवा धर्म संसदेत’ सहभागी झाले आहेत. सेवाज्ञ संस्थानमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीनदिवसीय कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.

भागवत म्हणाले

-‘धर्म’ आणि ‘रिलिजन’ हे समानार्थी नाहीत
-‘धर्म’ ही व्यापक संकल्पना असून तो माणसाला मुक्तीकडे नेतो
- सत्य, करुणा, शुचिता आणि आत्मसंयम या मूल्यांवर ‘धर्म’ आधारित
- धर्म समजून घेण्यासाठी पूर्वग्रह बाजूला ठेवून तो आचरणात आणणे आवश्यक
- ‘धर्म’ हा विश्वाची धारणा करणारा आणि सर्वांच्या प्रगतीला चालना देणारा सिद्धांत
- मानवाचे कर्तव्य ठरविताना प्रत्येक सजीव आणि वस्तूच्या स्वभावाचाही विचार धर्मात

• निसर्गाचे संरक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य असून जंगलांचा विनाश आणि पर्यावरणाची हानी म्हणजे ‘अधर्म’ आहे.

• प्रत्येकाने स्वतःच्या परंपरांशी निष्ठा राखतानाच इतरांच्या उपासना पद्धतींचा आदर करावा. भारताची परंपरा लोकांना जोडण्याची आहे, विभाजित करण्याची नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT