पुणे

छत्रपती संभाजी तलाव सुशोभिकरण

CD

सोलापुरातील धर्मवीर संभाजीराजे तलाव गूगल सर्च करून फोटो घ्यावा.
धर्मवीर संभाजीराजे तलावाचे संग्रहित छायाचित्र घ्यावे.
---
१२ कोटी पाण्यात; नवीन ६० कोटींचा प्रस्ताव तयार
धर्मवीर संभाजीराजे तलाव सुशोभीकरण : जुन्या कामांवर प्रश्नचिन्ह
प्रमिला चोरगी : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : विजयपूर रस्त्यावरील धर्मवीर संभाजीराजे तलाव सुशोभीकरणासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पाच वर्षांपूर्वी १२ कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याने कामे कमी अन्‌ पैसाच अधिक खर्च झाला. हा पैसा पाण्यातच गेला. आता नव्याने ६० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, जुनीच कामे यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
यापूर्वी झालेल्या कामांचा लेखाजोखा, खर्चाचे ऑडिट आणि प्रत्यक्ष काम याचा कोणताही विचार न करता पुन्हा सुशोभीकरणाचा घाट घातला जात असल्याने महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
---
तलावाचा २०१८ चा आराखडा
विजयपूर रस्त्यावरील संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत १२ कोटी २१ लाख १३ हजार रुपयांचा निधी २०१८ मध्ये मंजूर केला होता. यामध्ये ७ कोटी ३२ लाख रुपये केंद्र शासन आणि उर्वरित ४ कोटी ८८ लाख रुपये सोलापूर महापालिकेचा हिस्सा होता. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर होती. मंजुरीनंतर १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट होती. २०२० पर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना २०२५ पर्यंतही कामे सुरू होती. केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका यांच्यातील सामंजस्य करार मंजुरीनंतर दोन आठवड्यांत करणे बंधनकारक असतानाही त्याचे उल्लंघन झाले. या निधीतून तलावाची सीमा निश्चित करणे, १ दशलक्ष क्षमतेचा एसटीपी प्रकल्प, स्वच्छतागृह सुधारणा, प्लॉटिंग राफ्टर्स, धोबीघाट नूतनीकरण, कारंजे, आयडॉल इमर्शन व्यवस्था, सिल्ट ट्रॅप, वृक्षलागवड, पडलेल्या भिंतींची दुरुस्ती, संरक्षक भिंत, पदपथ, सौरदिवे, बसण्यासाठी बाक आदी कामांचा समावेश होता.
---
चाैकट
हे आहेत आरोप...
- झाडांच्या लागवडीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री १५०० झाडे दाखवून तब्बल १३ लाख रुपयांची उधळपट्टी झाली आहे.
- तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ३७ लाख रुपये खर्च केल्याचे दाखविले मात्र आजही तलावात जलपर्णी कायम आहे.
- याशिवाय यापूर्वी तलाव विकासासाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च केले. कोणत्या कामावर खर्च केले याची कोणतीच माहिती संबंधित विभागाकडे नसल्याचे दिसून येते.
---
चाैकट
असा आहे नवा आराखडा
- धर्मवीर संभाजीराजे तलाव सुशोभीकरणासाठी २०२५ मध्ये ६० कोटींचा नवा विकास आराखडा तयार
- चार टप्प्यांमध्ये केली जाणार कामे. पहिल्या टप्प्यातील पाच कोटींच्या कामांसाठी नावीन्यपूर्ण योजना २०२६-२७ मधून प्रस्ताव
- पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, पॅगोडा, पार्किंग, कंपाउंड वॉल, उद्यान, झाडे, मुलांचे उद्यान व वॉटर फाउंटन यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- दुसऱ्या टप्प्यात घाट सुशोभीकरणासाठी ५ कोटींचा आराखडा आहे.
- तिसऱ्या टप्प्यात १.९१ किलोमीटर लांबीच्या बाबा गाडी ट्रॅकसाठी २१ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर चौथ्या टप्प्यात प्रवेश मार्ग, पार्किंग, राणी लक्ष्मीबाई पुतळा, ॲडव्हेंचर पार्क, ग्लोब शिल्प, पक्षी निरीक्षण मनोरा, कमळ तलाव, वॉक-वे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT