विधायक
..................
दिव्यांगांतील माणुसकीचा धागा अधिक घट्ट
ढेबेवाडीत स्वतःकडील अधिकचे साहित्य दिले गरजूंना; उपक्रमाचे काैतुक
राजेश पाटील ः सकाळ वृत्तेसवा
ढेबेवाडी, ता.२३ : परिसरातील दिव्यांग बांधवांनी आपल्याकडे जादा असलेली तीनचाकी सायकल, वॉकर, आधारकाठी, कुबड्या, व्हीलचेअर आदी साहित्य ज्यांच्याकडे नाहीत, अशा आपल्याच गरजू दिव्यांग बांधवांना देत माणुसकीचा धागा अधिक दृढ केला. येथे झालेल्या एका कार्यक्रमात या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थितही भारावून गेले.
दिव्यांगांना सुलभपणे वावर करता यावा, यासाठी विविध शिबिरे, योजनांतून आधार देणारी वेगवेगळी साधने दिली जातात; परंतु ग्रामीण-डोंगर भागातील काही जण मोबाईल संपर्काच्या अभावी तिथंपर्यंत पोहचत नाहीत. काही जणांकडे, तर नवीन पद्धतीच्या आधुनिक साहित्याचा अभावच असतो. जुन्या साधनांचा वापर करताना त्यांच्यासमोर अडचणीही येतात. दुसरीकडे एखाद्या दिव्यांगाकडे, तर त्यांना मिळालेली अनेक साधने पडून असतात. अशीही परिस्थिती असते. या पार्श्वभूमीवर येथील दिव्यांग व्यावसायिक प्रवीण मातने, दिलीप जाधव, विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जादा झालेली व घरात पडून असलेली साधने ज्या बांधवांकडे ती नाहीत, अशा बांधवांना वाटप करण्यासाठी जमा करण्याचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी कुबड्या, आधार काठी, वॉकर, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर आदी आपल्याकडील जादाचे साहित्य जमा केले. येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना या साधनांचे वाटप केले. अनिल पानस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. अभिमान जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एम. एस. पाटील, रामभाऊ कापसे, वैभव पाटील, सागर गरुड, रोहित बेलवणकर, सचिन जानुगडे आदींसह विद्यार्थी, नागरिक, शिक्षक उपस्थित होते. श्री. जानुगडे यांनी आभार मानले.
-------
(कोट)
----------
ग्रामीण भागातील अनेक दिव्यांग बंधू-भगिनीपर्यंत विविध साधनांच्या वाटपासाठी आयोजित शिबिरांची माहिती पोहचत नाही. त्यांच्यापर्यंत त्यांना उपयोगी पडणारी साधने पोचविण्यासाठी हा उपक्रम पुढेही सुरूच राहील. ज्यांच्याकडे जादाचे साहित्य असेल, त्यांनी ते जमा करावे.
- प्रवीण मातने,
ढेबेवाडी
B0803
ढेबेवाडी : दिव्यांगांना विविध साधनांच्या वाटप प्रसंगी एम. एस. पाटील, प्रवीण मातने व अन्य.
----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.