राजाराम पूल - साईसेवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या हस्ते नीला चांदोरकर आणि प्रमोद आहेर यांना रविवारी गौरविण्यात आले. 
पुणे

संत साईबाबा हे खऱ्या अर्थाने धन्वंतरी

सकाळवृत्तसेवा

धायरी - ‘‘संत साईबाबा हे खऱ्या अर्थाने धन्वंतरी होते. सबुरी ठेवली तर आयुष्य सुखकर होते आणि श्रद्धा दृढ असली, तर आरोग्य सांभाळता येते. त्यांनी दिलेल्या श्रद्धा आणि सबुरी या दोन औषधांनी सगळ्या व्याधी बऱ्या होतात,’’ असे प्रतिपादन श्रीगुरू बालाजी तांबे यांनी रविवारी येथे व्यक्त केले. 

साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त साईसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साईरत्न आणि साईसेवा पुरस्काराचे वितरण बालाजी तांबे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. साईरत्न पुरस्कार साईभक्त नानासाहेब चांदोरकर यांच्या नातसून नीला चांदोरकर यांना देण्यात आला. तर ‘शिर्डी गॅझेटिअर अनटोल्ड स्टोरीज’ या पुस्तकाचे लेखक प्रमोद आहेर यांना साईसेवा पुरस्कार देण्यात आला. 

या प्रसंगी नीला चांदोरकर, प्रमोद आहेर, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक अनिल कवडे आदी उपस्थित होते. तसेच शिर्डीतील पहिले भक्तनिवास म्हणून ओळखले जाणाऱ्या हरी विनायक साठे यांच्या साठेवाड्याचे संचालक आणि त्यांचे वंशज दुर्गाप्रसाद साठे यांचा या प्रसंगी सत्कार झाला. 
‘‘साईभक्त नानासाहेब चांदोरकरांची वंशज म्हणून साईरत्न हा गौरव म्हणजे आमचे भाग्य असून, साईबाबांच्या सान्निध्यात राहिल्याने खऱ्या अर्थाने ज्ञानसागरात न्हाऊन निघालो आहेत,’’ असे मत नीला चांदोरकर यांनी व्यक्त केले. आहेर, कवडे यांचीही या वेळी भाषणे झाली. 

माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. साईसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, साईदास कांचन, सुशील नलावडे आणि साईभक्तांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धदेखील यात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT