पुणे

कोरेगाव धोम धरणाची आज परिक्रमा

CD

धोम धरणाची आज परिक्रमा

कोरेगाव, ता. १२ : वाई, सातारा, जावळी व कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या धोम धरणाच्या स्थळावर धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने उद्या (ता. १३) जलपूजन व धोम धरण परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे.
यंदा धोम धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण लाभक्षेत्रातील वाई, सातारा, जावळी व कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी धोम धरणातील पाण्याचे पूजन आणि धोम धरण परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात लाभक्षेत्रातील प्रत्येक गावातील शेतकरी, तसेच पाणी वापर संस्था प्रतिनिधींशी संवाद साधण्यात येणार आहे. मागील वर्षातील पाणीवाटप व वापराचा आढावा घेऊन आगामी वर्षातील परिस्थितीनुसार पाणी नियोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्गे, कार्याध्यक्ष रणजित फाळके, सचिव नंदकुमार माने-पाटील यांच्यासह जगदीश पवार, किशोर राऊत, माणिकराव भोसले, संजय गायकवाड, सुधाकर बर्गे, अर्जुन भोसले, पृथ्वीराज माने, संतोष जाधव, नेताजी भोसले व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या परिक्रमेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्या (रविवारी) सकाळी साडेनऊ वाजता सातारारोड येथे भीमनगर फाट्यावर जमावे, असे आवाहनही समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT