किरकटवाडी (पुणे) : पाटबंधारे विभागात तब्बल 38 वर्षे सेवा बजावून 31 मे 2020 रोजी सहाय्यक स्थापत्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचारी काकांनी सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य म्हणून निवृत्ती नंतरही काम करत राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोंडीबा मारुती भागवत काका असे त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव असून 'सेवा' संपली तरी त्यांच्यातील 'सेवाभाव' कायम असल्याचे दिसत आहे. पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भागवत काकांच्यां या निर्णयाचे कौतुक केले आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणासारख्या अतिमहत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी अनुभवी व जबादार अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने भरती किंवा बदलीची प्रक्रिया होणे शक्य नाही. त्यामुळे पुढील काही दिवस सेवानिवृत्तीनंतरही कार्यरत राहून प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे भागवत यांनी सांगितले. विशेष म्हणजे भागवत काका कामाचा मोबदला न घेता काम करत आहेत.
1 ऑक्टोबर 1982 रोजी पाटबंधारे विभागात सेवेला सुरुवात केलेल्या भागवत यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथील कार्यालयात 11 वर्ष, पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्पांतर्गत शिक्रापूर येथे 20 वर्ष व खडकवासला पाटबंधारे विभागातील खडकवासला धरण शाखेवर 7 वर्ष अशी एकूण 38 वर्षे अविरत सेवा बजावली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पानशेत, वरसगाव व टेमघर या तीन धरणांतील पाण्याचे नियंत्रण खडकवासला धरणावरून केले जाते. त्यामुळे 38 वर्षांच्या सेवेतील सर्वात आव्हानात्मक काम हे खडकवासला धरणावर सेवा बजावताना अनुभवायला मिळाले; या भागात पावसाचे प्रमाण नेहमी जास्त राहत असल्याने रात्रंदिवस खडकवासला धरणाच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून राहावे लागते व योग्य अंदाज घेऊन पाण्याची पातळी सतत नियंत्रित ठेवावी लागते. नवीन कर्मचाऱ्याला सहजासहजी या गोष्टी जमत नाहीत. त्यामुळे कुटुंबियांचा विरोध असतानाही पुढे काही दिवस प्रशासनाला सहकार्य म्हणून काम करत राहणार असल्याचे धोंडीबा भागवत यांनी भावनिक होऊन सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.