पुणे

अकोला

CD

डिझेल टंचाईमुळे शेतीकामांना ‘ब्रेक’
----
पश्चिम विदर्भात मशागतीच्या दरवाढीमुळे ताण वाढला; शेतकरी अडचणीत
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : मागील काही दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमशागतीच्या कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रॅक्टर, पंप आणि इतर शेती यंत्रसामग्रीसाठी आवश्यक असलेल्या डिझेलच्या उपलब्धतेत अनियमितता निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी मशागतीची कामे खोळंबली आहेत.
डिझेल टंचाईमुळे यंत्रचालकांनी मशागतीचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार आणखी वाढला आहे. काही भागांत पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा दोन्हींचा तोटा सहन करावा लागत आहे.
अकोला जिल्ह्यातही अनेक ठिकाणी डिझेलची उपलब्धता मर्यादित असल्याचे चित्र आहे. विशेषतः हंगामातील नांगरणी, पेरणीपूर्व मशागत आणि सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. डिझेल मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर प्रत्यक्ष वाहने घेऊन जावे लागत असल्याने अतिरिक्त वेळ आणि खर्च वाढत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात तर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकामे थांबवावी लागली आहेत. ट्रॅक्टरसह थेट पंपांवर जाण्याची अट असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असून, डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी सार्वत्रिक मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, वाशीम जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा केल्याचा दावा केला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात आठ लाख लिटरपेक्षा अधिक डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत असले तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा अद्याप असंतुलित असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
पश्चिम विदर्भातील या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑईल कंपन्यांच्या समन्वयाने पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पेट्रोल पंपांवर गर्दी आणि गैरव्यवस्थापन टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोट ----
सोमवारी ट्रॅक्टर घेऊन अमडापूर, नंतर उदयनगर (उंद्री) येथील पंपावर गेलो. तेथे डिझेल मिळाले नाही. नंतर वैरागड (तालुका चिखली) येथील पंपावर २००० रुपयांचेच डिझेल मिळाले. मंगळवारी शेतीची कामे केली. काल दुपारनंतर डिझेल अभावी काम बंद आहे. आणि ही परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे.
- लिंबाजी लखाडे, शेतकरी, खुदनापूर

रात्री २ वाजेपर्यंत लाइनमध्ये उभे राहून डिझेल मिळाले नाही. शेतीचे फक्त २० ते २५ दिवसांची कामे बाकी आहे. एकही जिल्ह्यातील नेता यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध व्हावे अशी काहीही सोय करताना दिसत नाही.
- अमोल खर्चे, शेतकरी, आडविहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॉकरोच जनता पार्टीची देशभरात हवा, फक्त २ दिवसात ४० हजार सदस्य; जाहीरनामा वाचून थक्क व्हाल, कुणी केलं सुरू?

Thane News: 'मराठी'मध्ये १४२ रिक्षाचालक नापास, विशेष मोहिमेत २,३१७ अमराठी चालकांची तपासणी

Viral Video: पुन्हा चर्चा मेलोडीची! मोदींनी मेलोनी यांना दिलं स्पेशल गिफ्ट, व्हिडिओ बनवत म्हणाल्या...

ठरलं! स्टार प्रवाहची नवी 'पाठराखीण' मालिका 'या' दिवशी येणार भेटीला, 'तारिणी'ला टक्कर देणार, कोणती मालिका घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात साडेचार हजार मेडिकल बंद

SCROLL FOR NEXT