पुणे

व्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा 

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्‍यक असते... व्यायामाचे विविध पर्याय उपलब्ध असताना, रोज किमान 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम प्रकार उपयुक्त आहे... या आणि अशा अनेक "टिप्स' देत मधुमहेतज्ज्ञ डॉ. शैलजा काळे आणि आहारतज्ज्ञ जॉय नवलकर यांनी "सकाळ'च्या फेसबुक लाइव्हमध्ये नेटिझन्सशी बुधवारी संवाद साधला. 

जागतिक मधुमेह दिनानिमित्त फेसबुक लाइव्हमध्ये डॉ. काळे आणि नवलकर बोलत होत्या. मधुमेहींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुले, युवक, गर्भार महिलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात मधुमेह होऊच नये आणि झाला तर तो नियंत्रणात कसा ठेवावा, हे सांगताना डॉ. काळे म्हणाल्या, ""मधुमेहींना हृदयविकाराचाही धोका असतो, त्यासाठी दररोज सुमारे 45 मिनिटे व्यायाम आवश्‍यक आहे. त्यात योगासने, जिमबरोबरच 45 मिनिटे चालणे अधिक उपयुक्त ठरू शकते. आहारामध्येही पोळी, भाताचे प्रमाण कमी केले पाहिजे. पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढविणे चांगले आहे. फळांमध्ये ज्यूस घेतला म्हणजे चालते, असा गैरसमज आहे. ज्यूस घेण्याऐवजी फळांचा आस्वाद घेतल्यास आरोग्यासाठी फलदायी ठरू शकते. कारण फळांमध्ये फायबर असते.'' मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यांचे सेवन हे अनारोग्याला आमंत्रण आहे अन्‌ त्यातून हृदयविकाराचाही धोका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जीवनशैलीमध्ये झपाट्याने बदल होत असताना, आहारही चौरस असणे गरजेचे आहे. त्यात व्यायाम अत्यावश्‍यक आहेच. बैठे काम करणाऱ्यांनी याबाबत अधिक सजग असले पाहिजे, असे नवलकर यांनी सांगितले. 

पुढील पिढीला "देणगी' देऊ नका 
लहान मुलांमध्ये "टाइप टू'चा मधुमेह वाढत आहे. त्यात आनुवांशिकता हा घटक प्रमुख आहे. त्यामुळे युवकांनी निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीवर भर दिला पाहिजे, अन्यथा पुढच्या पिढीला मधुमेहाची "देणगी' मिळू शकते, अशी भीतीही डॉ. काळे यांनी व्यक्त केली. मधुमेहींना आधार देण्यासाठीच इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनने या वर्षी कुटुंब या घटकावर अधिक लक्ष देऊन जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

* ज्यूस नको; फळे खा 
* मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन टाळा 
* पोळी, भातऐवजी पालेभाज्या, कडधान्यांवर भर द्या 
* रोज किमान 45 मिनिटे चाला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT