पुणे

मेट्रोबाबत वेगवेगळी धोरणे

सकाळवृत्तसेवा

पुणे - मेट्रो स्टेशनच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला असताना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मात्र हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या दुतर्फा चार एफएसआय देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या दोन्ही मेट्रो मार्गांवर बांधकामांना परवानगी देण्यासंदर्भातील वेगवेगळे धोरण राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीएमआरडीएने मेट्रो प्रकल्पाचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यासंदर्भातील करारनामा मान्यतेसाठी राज्य सरकारच्या कार्यकारी समिती व अर्थ विभागाकडे पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर कामाचे आदेश देण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या वतीने वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूंस पाचशे मीटरच्या परिसरात सरसकट चार एफएसआय देण्याचा (टीओडी झोन) निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र त्यामध्ये ऐनवेळी बदल करीत केवळ मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ‘नॅशनल टीओडी पॉलिसी’चे कारण महापालिकेने पुढे केले आहे. असे असताना पीएमआरडीएने मात्र त्याच पॉलिसीचा आधार घेत हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर दोन्ही बाजूंस पाचशे मीटरच्या परिसरात सरसकट चार एफएसआय देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे महापालिका अडचणीत आली आहे.

मेट्रो मार्गावर तेवीस स्टेशन
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार आहे. खासगी भागीदारीच्या माध्यमातून तो राबविण्यात येणार आहे. या मार्गावर २३ स्टेशन असणार आहेत. पीएमआरडीएने केलेल्या शिफारशीमुळे मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंस पाचशे मीटरच्या परिसरात चार एएफएसआय मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT