Difficulties in starting a high school in a village in Mulshi taluka 
पुणे

मुळशी तालुक्यात शहराजवळील गावातील हायस्कूल सुरू करण्यात अडचणी

सकाळवृत्तसेवा

भुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यातील शहराजवळील गावातील हायस्कूल सुरू करण्यास सर्व पालकांची संमती मिळत नाही. तसेच ग्रामपंचयतीही तयार नाहीत. त्यामुळे येथील हायस्कूल सुरू करण्यास अडचणी येत आहेत. तालुक्यातील पश्चिम भागातील हायस्कूल सुरू झाली आहेत.

''तालुक्यात भूगाव येथील हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत 88 विद्यार्थी आहेत. दरम्यान 40 पालकांनी संमती पत्रे दिली आहेत. नववी इयत्तेत 135 विद्यार्थी असून फक्त 45 पालकांनी संमती पत्रे दिली आहेत'' अशी माहिती मुख्यध्यापक जी. व्ही पाबळे यांनी दिली. त्यामुळे हायस्कूल सुरू करता आले नाही. तसेच घोटावडे येथील हायस्कूल अद्याप सुरू होऊ शकले नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, पश्चिम भागातील आंदगाव, रिहे, खांबोली येथील हायस्कूल सुरू झाली आहेत. आंदगाव येथे दहावी इयत्तेत 45 विद्यार्थी असून शासनाने सुचविल्या प्रमाणे (ता. 23) नोव्हेंबर पासून वेळेत सुरू करण्यात आले असे मुख्यध्यापक के. जे. पवार यांनी सांगितले.

तसेच घोटावडे येथील हायस्कूल 13 डिसेंबर पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यध्यापिका एस. टी. वाळंज यांनी सांगितले. सर्व शिक्षकांची करोना तपासणी करण्यात आली आहे.  अंतर ठेऊन विद्यार्थ्यांना बसविण्यात येत आहे. तसेच पालक व शाळा समितीची बैठक घेऊन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT