डिगेवाडीत घराला आग;
साडेचार लाखांचे नुकसान
मोरगिरी, ता. ६ : डिगेवाडी- अडूळ (ता. पाटण) येथे राहत्या घरास आज साडेदहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत घरासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तलाठी अक्षय जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
याबाबत घटनास्थळावरील माहितीनुसार, अडूळ गावातील डिगेवाडी येथील किसन कवर यांचे राहते घर बंद होते. आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना घरातून धुराचे लोट येताना दिसले. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. सरपंच वसंत कवर, ग्रामसेवक प्रतीक गुरव, पोलिस पाटील महेश कदम, ग्रामस्थांनी परिश्रम घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या अग्निशमन बंबाने आग विझवण्यात आली.
आग लागली, त्यावेळी घरात कुणीही नव्हते. घराला कुलूप होते. त्यामुळे आग शॉर्टसर्किटने लागली, की अन्य कशाने लागली, याबाबत चर्चा होत्या. त्यामुळे आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी झाली आहे.
आगीमध्ये घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराचे छप्पर आणि भिंतींचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जळीतग्रस्त कुटुंबासह ग्रामस्थांनी केली आहे.
W55556
डिगेवाडी : आग लागून घराचे झालेले नुकसान. (अरुण गुरव ः सकाळ छायाचित्रसेवा)
.......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.