JWL26A05022
जवळा ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत मारुती रोडे यांच्या पुढाकारातून आणि पुण्याच्या एचपीडी डिझायनिंग कन्सल्टंट्स या कंपनीच्या माध्यमातून शाळेला सहा संगणक भेट देण्यात आले.
जवळा प्राथमिक शाळेची
डिजिटलकडे वाटचाल
जामखेड , ता.३१ ः जवळा प्राथमिक शाळेची डिजिटलकडे वाटचाल चालू असून, याकामी माजी विद्यार्थी प्रशांत रोडे यांनी पुढाकार घेतला आहे.
जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत मारुती रोडे यांच्या पुढाकारातून आणि पुण्याच्या एचपीडी डिझायनिंग कन्सल्टंट्स या कंपनीच्या माध्यमातून जवळा प्राथमिक शाळेला सहा संगणक भेट देण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने हा उपक्रम साकारण्यात आला. या संगणक लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक हाताळणी, टायपिंग, डिजिटल अध्ययन, शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर, माहितीचा शोध, शैक्षणिक व्हिडिओ तसेच विविध डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
या अत्याधुनिक संगणक लॅबचे शुभारंभ कार्यक्रमास एचपीडी डिझायनिंग कन्सल्टंट्स कंपनीचे पराग पाठक, प्रशांत हुडर, सुभाष कुमार तसेच प्रशांत रोडे, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोदाडे, शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, केंद्र समन्वयक योगेश खेडकर, ज्योती क्रांती मल्स्टिटेटचे अध्यक्ष आजिनाथ हजारे, सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, माजी उपसभापती दीपक पाटील, सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र पवार, डाॅ. महादेव पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, मारुती रोडे, विष्णू हजारे, राजेंद्र राऊत, राहुल पाटील, अशोक पठाडे, राहुल पाटील, किसन सरोदे, गौतम कोल्हे, उमेश रोडे, मुकुंद रोडे यांच्यासह ग्रामस्थ ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास हजारे यांनी, तर बाळासाहेब रोडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.