Digital India digital revolution in the country after Corona C-DAC pune sakal
पुणे

कोरोनानंतर देशातील डिजिटल क्रांतीला वेग

सी-डॅकच्या स्थापनादिनी तज्ज्ञांचे प्रतिपादन; तीन उत्पादनांचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डिजिटल परिवर्तन हा यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा मुख्य गाभा आहे. कोरोनानंतर देशातील डिजिटल क्रांतीला वेग आला असून, लवकरच डिजिटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असा विश्वास प्रगत संगणन अध्ययन केंद्राच्या (सी-डॅक) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

दरवर्षी गुढीपाडव्याला सी-डॅकचा स्थापना दिवस साजरी करण्यात येतो. पुणे येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (आयआयटीएम) संचालक डॉ. क्रिष्णन आर, सी-डॅकचे महासंचालक कर्नल ए.के.नाथ (निवृत्त), ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, तर व्हर्च्युअल पद्धतीने इंटेलचे उपाध्यक्ष डॉ.नॅश पेलास्वामी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. राजेंद्र कुमार, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस.सोमनाथ उपस्थित होते. कार्यक्रमात त्रिनेत्र, टेट्रा आणि एम-कवच या नव्या उत्पादनांचे अनावरण करण्यात आले.

चंद्रशेखर म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानातून सर्वसामान्य व्यक्तीचे आणि सरकारी योजनांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. कोरोनामधून बाहेर पडताना डिजिटल अर्थव्यवस्था सर्वाधिक उपयोगाला आली. तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक नेतृत्व आपण विकसित करायला हवे. येत्या काळात सेमिकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, क्वांटम कॉम्प्युटिंग आदी क्षेत्रात जागतिक दर्जाचे काम आपल्याला करायचे आहे.’’ अवकाश क्षेत्रातील भारताच्या वाढत्या कामगिरीबरोबरच माहितीचे संकलन आणि व्यवस्थापनात येत्या काळात मोठी वाढ होणार असल्याचे सोमनाथ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी, उपग्रह आधारित कम्युनिकेशन, दळणवळण, सुरक्षा, स्मार्ट सप्लाय सिस्टम आदी क्षेत्रात आता डिजिटल परिवर्तन होत आहे. यासाठी सुपरकंप्युटींग, क्लाऊड आणि कुशल मनुष्यबळाची गरज असणार आहे.’’ पुढील पाच वर्षात भारत डिजिटल अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास राजेंद्र कुमार यांनी व्यक्त केला.

स्वदेशी उत्पादने

  • त्रिनेत्रा : सुपरकंप्युटींगसाठी ६०० जीबीपीएस थ्रूपुटचे इंटरकनेक्टींग डिव्हाईस

  • नेक्स्ट जनरेशन टेट्रा नेटवर्क : स्वदेशी बिनतारी रेडिओ संदेशवहन यंत्रणा. आपत्कालीन प्रसंगी वापरासाठी सुरक्षित आणि सक्षम, तसेच सार्वजनिक सुरक्षा, रेल्वे, विमानतळ, सागरी बंदर, वाहतूक, उद्योगांतील संदेशवहनासाठी एक स्वदेशी प्रणाली उपलब्ध झाली आहे.

  • एम-कवच : हे अॅड्रॉईड मोबाईलसाठी तयार करण्यात आलेले सुरक्षा अॅप असून,यामुळे वापरकर्त्याला मोबाईलच्या सुरक्षेला बाधा असलेल्या कॉन्फुग्रेशनची माहिती मिळते. अशा वेळी मोबाईल लॉक करणे, पासवर्ड बदलणे, ओटीपीला दुसऱ्या डिव्हाईसवर जाण्यापासून रोखणे आदी सूचना तातडीने मिळतात. मोबाईल गव्हर्नन्स, ऑनलाइन पेमेंट आणि इ-कॉमर्सशी निगडित सर्व व्यवहारांना सुरक्षा प्रदान करते. प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT