पुणे

कऱ्हाड डिजीटल हयात प्रमाणपत्र न न केल्यास पेन्शन बंद

CD

डिजिटल हयात प्रमाणपत्र काढा, अन्यथा पेन्शन बंद

तहसीलदार ढवळे; कऱ्हाडला तीन हजारांवर लाभार्थ्यांना इशारा

कऱ्हाड, ता. १७ ः सरकारी योजनेतून दरमहा मिळणाऱ्या निवृत्तिवेतनाचा आधार असलेल्या लाभार्थ्यांसाठी आता डिजिटल हयात प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. त्यामुळे तालुक्यातील तीन हजार ३०२ लाभार्थ्यांनी अद्याप प्रमाणपत्रच काढलेले नाही. येत्या चार दिवसांत ते काढून घ्यावे, अन्यथा त्या लाभार्थ्यांची पेन्शन बंद केली जाईल, असा इशारा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिला.

तालुक्यातील १९ हजार १५१९ लाभार्थ्यांना विशेष साहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची पेन्शन सुरू आहे. ती पेन्शन डीबीटी संगणक प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. त्या प्रणालीअंतर्गत पेन्शनसाठी लाभार्थ्यांनी वर्षातून एकदा डिजिटल हयात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देऊनही तालुक्यातील तीन हजार ३०२ लाभार्थ्यांनी अद्याप ते प्रमाणपत्र काढलेले नाही. डिजिटल हयात प्रमाणपत्र काढण्याबाबत लेखी, तोंडी सूचना दिल्या आहेत, तरीही प्रमाणपत्र न काढल्याने संबंधित लाभार्थ्यांना कार्यालयाकडून लेखी पत्र देऊन चार दिवसांत प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन तहसीलदार ढवळे यांनी केले आहे. त्यामुळे राहिलेल्यांनी मुदतीत डिजिटल हयात प्रमाणपत्र काढावे, ते न काढल्यास पेन्शन बंद होण्याची कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

..............
चौकट
..................


चार दिवसांनंतर कारवाई

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ते प्रमाणपत्र काढलेले नाही, त्यांनी चार दिवसांच्या ते काढून घ्यावे. त्याची प्रत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करावी, असे आवाहन तहसीलदार ढवळे यांनी केले आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या पेन्शनबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT