RTO-Pune 
पुणे

Coronavirus : ‘आरटीओ’ देणार डिजीटल पास

सकाळवृत्तसेवा

पुणे - अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या वाहनांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही (आरटीओ) डिजीटल (ई- पास) देण्यास शनिवारपासून सुरवात झाली आहे. ही सेवा अहोरात्र सुरू राहणार असून, किमान अर्ध्या तासात चालकांना हे पास ऑनलाईन पद्धतीने मिळतील.

पोलिसांच्या धर्तीवर हे पास (क्‍यूआर कोड) उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने याबाबत शुक्रवारी रात्री आदेश दिल्यावर शनिवारपासून पास देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे पास हवे असल्यास त्यांनी
https://transport.maharashta.gov.in या वेबसाईटवर ई- पास, या विभागावर क्‍लिक करायचे आहे. तेथे एमएच- १२ (पुणे) हा विभाग निवडल्यावर अर्ज उपलब्ध होईल. त्यावर तपशील भरायचा आहे. त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर पास तयार होईल आणि संबंधितांना तो पीडीएफद्वारे ई- मेलवर पाठविला जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली. 
 
प्रक्रिया २४ तास
पास देण्याची प्रक्रिया २४ तास सुरु असेल. त्यासाठी ३ शिफ्टमध्ये मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ दिवसांत ‘आरटीओ’ने ५८४ पास दिले आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांना ’आरटीओ’मध्ये  २०-२६०५८०९० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा Email -rto.१२-mh@gov.in या ई- मेल आयडी वर संपर्क साधता येईल, अशी माहिती भोर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: दिल्ली- गुजरात सामन्यात Fixing? त्या तीन घटनांमुळे चर्चेला उधाण

Crime: 'काका आणि मित्रासोबत शरीरसंबंध ठेव'; प्रियकराची प्रेयसीकडे भलतीच मागणी, नकार देताच... धक्कादायक कांड उघड

उन्हाचा तडाखा वाढला, वाहनांची घ्या विशेष काळजी; वाहतूकतज्‍ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

Horoscope : उद्यापासून कालाष्टमी योग! काळभैरव दूर करणार 'या' 3 राशींवरचे विघ्न-संकट; घरी येणार पैसा, स्पर्धा परीक्षेत मिळणार यश

Latest Marathi News Live Update : पदभार स्वीकारताच जालन्यात सीईओकडून जिल्हा परिषदेत झाडाझडती

SCROLL FOR NEXT