पुणे

डिजिटल काळात सुरक्षा महत्त्वाची

CD

डिजिटल काळात सुरक्षा महत्त्वाची

पंतप्रधान मोदी; देशाने गुलामीची मानसिकता सोडली

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २२ ः ‘‘डिजिटल युगामुळे सुविधा वाढली असली तरी सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची बनली आहे. विशेषतः डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना चिंतेत टाकणाऱ्या आहेत. जनजागृती वाढली असली तरी अजूनही अशा घटना होत आहेत. त्यामुळे अनोळखी दूरध्वनी, लिंकपासून व सरकारी अधिकारी बनून भीती घालणाऱ्या लोकांपासून सर्वांनी सावध रहावे,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणी वरील ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना केले.
दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्षमतेकडे भारत आता अधिक गांभीर्याने पाहत आहे. एआय परिषदेच्या निमित्ताने जगातील अनेक नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांना भेटण्याची संधी मला मिळाली. ‘एआय’ हा केवळ तंत्रज्ञानाचा विषय राहिलेला नाही तर शेती, पशुपालन आणि आरोग्य सेवांपर्यंत त्याची व्याप्ती पोहोचली आहे. एआय मुळे उत्पादन वाढत आहे तर खर्च कमी होत आहे. एआयच्या माध्यमातून आधुनिकता, अवयव दानाच्या माध्यमातून संवेदनशीलता आणि डिजिटल जागृतीच्या माध्यमातून सुरक्षा या तिन्ही गोष्टी मिळून नव्या भारताची ओळख बनत आहे. समाजातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत जेव्हा तंत्रज्ञान पोहोचेल, तेव्हाच ते सफल तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाईल.
एआयच्या मदतीने प्राचीन ग्रंथ आणि प्राचीन इतिहास संरक्षित केले जात आहे. याशिवाय पांडु लिपी वाचण्याजोगी बनवली जात आहे. एआय परिषदेत तीन ‘मेड इन इंडिया’ एआय मॉडेल लाँच करण्याात आले. देशात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी एआय परिषद होती, असे मोदी म्हणाले. ‘‘देश आता गुलामीची मानसिकता सोडत भारतीय संस्कृतीशी संबंधित गोष्टींना महत्त्व देऊ लागला आहे,’’ अशी टिपणी मोदी यांनी केली.

‘अवयवदान श्रेष्ठ दान’
अवयव दान हे श्रेष्ठ दान असल्याचे सांगत मोदी यांनी केरळमधील एलिन अब्राहम तर दिल्लीतील लक्ष्मी देवी यांचे उदाहरण दिले. अवयव दानामुळे अनेक कुटुंबाचे आयुष्य बदलू शकते. अवयव दान हे केवळ आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे नाही तर ती मानवतेची मोठी सेवा असल्याचे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT