ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही
दिलीप बाबर; कळंभेत भाजप कार्यकर्त्यांकडून सत्कार
आनेवाडी, ता. १ : ही निवडणूक अत्यंत कठीण होती. विरोधकांकडे मोठी ताकद होती. मात्र, माझा ग्रामस्थांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क आणि विश्वास यामुळे मला विजयाची खात्री होती. कळंभे गावाने १०० मतांची आघाडी देत माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांनी केले.
कळंभे (ता. वाई) येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संतोष शिंदे (जांब), सुरेश पवार (उडतरे), सुरेश बाबर (उडतरे), कळंभे विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष यशवंत शिवथरे, विलास शिवथरे, चित्तरंजन गायकवाड, माजी उपसरपंच हणमंतराव गायकवाड, श्री मानाई देवी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय शिवथरे, माजी उपसरपंच संभाजी गायकवाड, विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ शिवथरे, हणमंत शिवथरे, मेरुलिंग दूध डेअरीचे अध्यक्ष भाऊसाहेब शिवथरे, शंकर शिवथरे, जितेंद्र गायकवाड, रोहिदास शिवथरे, अमोल शिवथरे, सुरेश गायकवाड, रामदास जाधव, संतोष गायकवाड, किरण शिवथरे आदींसह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री. बाबर म्हणाले, ‘‘भुईंज कारखाना व जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची ताकद विरोधकांकडे असतानाही ग्रामस्थांनी माझ्या बाजूने उभे राहात मला विजयी केले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माजी आमदार मदन भोसले यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला उमेदवारी मिळवून दिली. डॉ. तानाजी शिवथरे यांनी प्रास्ताविक केले. चित्तरंजन गायकवाड यांनी आभार मानले.
02406
कळंभे : दिलीप बाबर यांचा सत्कार करताना ग्रामस्थ. (प्रशांत गुजर ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.