पुणे

रानमळा येथे विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीबाबत जागृती

CD

बेल्हे, ता. २४ : रानमळा (ता. जुन्नर) येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने नुकत्याच आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरासह विविध उपक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी रानमळा गावामध्ये प्रभातफेरी काढून नशामुक्तीबाबत जनजागृती केली. “नशा सोडा-जीवन वाचवा”, “दारू, तंबाखूला नकार द्या”, “निरोगी जीवनाची निवड करा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवला. यानंतर विद्यार्थ्यांनी नशामुक्ती विषयावर पथनाट्य सादर केले.दररोज विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित केली होती. यामध्ये ज्योती दहिफळे - सायबर सुरक्षा, प्रा. संभाजी ढमाले- पाणलोट विकास व पडीक जमीन व्यवस्थापन, डॉ. माणिक  बोऱ्हाडे- महिला सक्षमीकरण, डॉ. राहुल गोंगे- भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी, सचिन भोजने- सामाजिक जडणघडणीत युवकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. रानमळा गावच्या सरपंच सविता तिकोणे यांनी याठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या श्रम संस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता, माती- पाणी परीक्षण, ग्राम सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती यासारखे विविध उपक्रम राबविले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती गायकवाड, सह कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रवीण गोरडे, प्रा. अजय नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे प्रा. अनिल पडवळ यांनी सांगितले. दरम्यान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी येथील इंदिरा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींही सहभागी झाल्या होत्या. या शिबिरासाठी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT