dilip walse Patil speak about maratha obc reservation dispute Sakal
पुणे

Maratha Reservation : आरक्षणाच्या विषयात टोकाचे बोलणे टाळावे - वळसे पाटील

सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यावरून राज्यात वाद सुरु असताना त्यात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावर अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मंत्री भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावर टोकाचं कुणीही बोलू नये असं वाटतं. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु, अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. राज्य सरकार सुद्धा त्याच मार्गाने प्रयत्न करत आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

पुण्यात आज (ता. ११) रयत शिक्षण संस्थेची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये,

सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. त्यावरून शिंदे गटातील मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिल्याने वाद सुरु झाला आहे. त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत राष्ट्रवादीत काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वळसे पाटील यांची भेट झाली. त्यावर विचारले असता, वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या कार्यालयात रयत शिक्षण संस्थेसंदर्भात बैठक होती.

या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच रयत शिक्षण संस्थेतील बदल किंवा माझ्या नावाच्या बदलासंदर्भात काही चर्चा झाली नाही. पवार साहेबांचे मी नेहमीच मार्गदर्शन घेत असतो.

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निकालाबद्दल वळसे पाटील म्हणाले, ‘‘ मी अजून गावाला गेलो नाही. पण या निवडणुकीत आमच्या विचाराच्या २४ ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सत्तेत आलो आहोत. चार ग्रामपंचायती स्थानिक पॅनलच्या तर दोन ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. स्थानिक प्रश्नांमुळे काही ठिकाणी थोडा बदल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT