SHARAD PAWAR DILIP WALSE PATIL 
पुणे

शरद पवारांचे पीए ते राज्याचे गृहमंत्री; दिलीप वळसे-पाटलांचा राजकीय प्रवास एका क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हायकोर्टाने याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. त्यामुळे नैतिकता म्हणून अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर गृहमंत्रिपद कोणाकडे जाईल, अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चांवर पडदा पडला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप वळसे-पाटील यांचेच नाव सूचवले होते. पण, प्रकृतीच्या कारणास्तव दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला होता. सध्या त्यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि कामगार खातं आहे. गृहमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचं खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. 

दिलीप वळसे-पाटील कोण आहेत?

दिलीप वळसे पाटील (जन्म ३० ऑक्टोंबर १९५६) माजी काँग्रेस आमदार आणि शरद पवार यांचे मित्र दत्तात्रय वळसे पाटील यांचे पुत्र आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. १९९० साली त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावरुन आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकली होती. तेव्हापासून ते आंबेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. १९९९ मध्ये त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.  मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात ते मंत्री होते. त्यावेळी त्यांच्याकडे उर्जा आणि वैद्यकीय शिक्षण खातं होतं. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणूनही सेवा दिली आहे.

दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहावेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी १९९९ ते २००९ या काळात अर्थ आणि योजना खातं, उर्जा मंत्रालय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSF) चे अध्यक्ष आहेत. दिलीप वळसे-पाटील  हे शरद पवार यांचे जवळचे मानले जातात.   5 फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT