Dimbhe Dam sakal
पुणे

Dimbhe Dam Full : डिंभे धरण ८७. ४४ टक्के भरले; आंबेगाव व शिरूर तालुक्यात घोडनदी काठावरील 45 गावांना सतर्कतेचा इशारा

हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) क्षेत्रात आतापर्यंत एकूण ६८४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम आहे.

डी. के. वळसे पाटील

मंचर - हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) क्षेत्रात आतापर्यंत एकूण ६८४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ३) संध्याकाळी चार वाजेपर्यंत ८७.४४ टक्के डिंभे धरण पाण्याने भरले आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून घोड नदीत पाणी कोणत्याही क्षणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे घोड नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे.' असे आवाहन डिंभे धरण विभागामार्फत करण्यात आले आहे.

सन 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात शनिवार (ता. ३) पर्यंत डिंभे धरण परिसरात एकूण ३३६ मिलिमीटर पाऊस झाला होता. ७५.८१ टक्के धरण भरले होते. यावर्षी ता. १५ जुलैपासून पासून पावसाने जोर धरला आहे. जवळपास दररोज पाऊस कोसळत आहे.

आजूबाजूच्या परिसरातून पाण्याचा विसर्ग धरणामध्ये सुरू आहे. धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक व डिंभे धरणाचे अधिकारी, कर्मचारी सतत धरणातील वाढत्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. धरणातून पाणी सोडण्याची यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.

त्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या विद्युत मोटारी व अन्य साहित्य घोड नदी पासून दूर न्यावे. नदीच्या आसपास गुरांचे गोठे असल्यास ते हलवावे. लहान मुले, वृद्ध, महिला नदीच्या काठावर जाणार नाही. याबाबत काळजी घ्यावी. असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

डिंभे धरण दहा तासात दोन टक्के भरले -

'डिंभे धरण सकाळी सहा वाजता ८५.६ टक्के भरले होते संध्याकाळी चार वाजता ८७.४४ टक्के टक्के भरले आहे. तब्बल दहा तासात दोन टक्क्यांनी पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे .. डिंभे गाव ते शिरूर या मार्गावरील घोड नदीच्या दोन्ही बाजूलाकाठावरील ४५ हून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT