पुणे

भोरमधील ६५५ दिव्यांगांना निर्वाह भत्ता

CD

हिर्डोशी, ता. ६ : पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी योजनेतून भोर तालुक्यातील ६५५ अतितीव्र दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांचा निर्वाह भत्ता थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी गुरुवारी (ता. ५) दिली.
समाज कल्याण विभाग पंचायत समिती भोर अंतर्गत भोर विकास गटातील सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील प्रती महिना ५०० रुपये प्रमाणे एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीचे प्रत्येकी एकूण ३ हजार ५०० रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार आहेत. भोर तालुक्यातील ६५५ पात्र लाभार्थ्यांना एकूण २२ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विपट व प्रशासन अधिकारी मिलिंद खोपडे यांनी सांगितली. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून दिवाळीच्या काळात हे अनुदान मिळणार असल्याने दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून आम्हा दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड होणार आहे, असे भोर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले व पदाधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

Pune Crime: पुणं हादरलं! पाय तोडून कचऱ्यात टाकले; सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

दोन महिन्यांनी शुक्र पुन्हा कन्या राशीत; पुढील १६ दिवस 'या' ५ राशींची चांदीच चांदी, २२ नोव्हेंबरपर्यंत अचानक धनलाभ

IPL 2027 Trade: लखनौ सुपर जायंट्स-राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठी डिल... ३-४ खेळाडू जाणार इथून तिथे; कोण असतील ते?

Vastu Tips: लाकूड, मेटल की दगड? वास्तुनुसार कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय प्रगतीचं रहस्य!

SCROLL FOR NEXT