Amol Palekar, Sandhya Gokhale
Amol Palekar, Sandhya Gokhale 
पुणे

दिग्दर्शक अमोल पालेकर यांचा पंचाहत्तरीत प्रवेश

सकाळवृत्तसेवा

ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर आज पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. यानिमित्त... अमोलजी, तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 

खरं तर चक्क ७४ वर्षे पूर्ण झाली आहेत, असं तुमच्याकडे बघून नक्कीच वाटत नाही. कारण तुम्ही अजूनही ऑलमोस्ट साठीत असल्यासारखे दिसता; मस्त वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालून हव्या त्या ठिकाणी म्हणजे अगदी गल्लीच्या कोपऱ्यावर असेल नाहीतर ‘फाइव्हस्टार’मध्ये असेल कुठेही, काहीही मनसोक्त जेवता, विशेषतः अमाप गोड खाता! तुमच्याबरोबर गप्पा मारल्यानंतर आम्हाला नक्कीच कळतं की तुम्ही nostalgia त अडकून न पडता समकालीन संदर्भांमध्ये वावरता. वर्तमानाच्या सर्व बारीकसारीक घटना टिपून त्याच्यावर तुमची मतं असतात; नफा-तोट्याची समीकरणं न मांडता ती परखडपणे व्यक्त करता. खरं तर तुमच्या एवढं समृद्ध आयुष्य जगलेली माणसं, आपापले दरबार भरवून त्या गोतावळ्यामध्ये रमताना दिसतात; हवे-नको ते सल्ले देत राहतात. तुम्ही मात्र सगळ्यापासून दूरस्थ राहू बघता. संध्याताई आणि तुम्ही असं एक घनदाट बेट असल्यासारखं वाटतं. नवनवीन पुस्तकं, नाटकं, सिनेमे, संगीत, देश-विदेशची भटकंती....सतत ॲन्टेनाज/ट्रान्समिशन ऑन... गेली तीन-चार वर्षे तर तुम्ही एका नवीनच, बहुतेकांना माहीत नसलेल्या वाटेवर स्वमग्न चालत आहात. www.thebrushwalla.com ही चित्रकार म्हणून तुमची खास वेबसाइट. केवढाऽऽऽ टप्पा आयुष्याचा पार पडलाय, असं कुठेतरी तुमच्या जगण्याचा विचार करताना वाटतंय. 

तुम्हाला काय वाटतंय या सगळ्याविषयी? कसा साजरा करणार आहात हा वाढदिवस? या प्रश्‍नांवर अमोलजींनी ‘सकाळ’च्या वाचकांशी साधलेला संवाद.

अमोल पालेकर यांनी लिहिलेला लेख :
स्वतःला गहाण न ठेवता... (अमोल पालेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT