Job  Job
पुणे

दिव्यांग उमेदवाराला कागदपत्रे देऊनही नाकारली नोकरी

सार्वजनिक आरोग्य विभागाने सांख्यिकी अन्वेषण ‘गट क’ पदासाठी फेब्रुवारीत परीक्षा घेतली. परीक्षेला सांख्यिकी हा विषय असेल तरच अर्ज करता येणार होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सार्वजनिक आरोग्य विभागाने सांख्यिकी अन्वेषण ‘गट क’ पदासाठी फेब्रुवारीत परीक्षा घेतली. परीक्षेला सांख्यिकी हा विषय असेल तरच अर्ज करता येणार होता. त्यासाठी दिव्यांग आरक्षणातून अर्ज भरला. परीक्षा दिली, गुणवत्ता यादीत नावही आले. त्यामुळे नोकरी मिळेल, अशी आशा होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र स्वतंत्रपणे सांख्यिकी हा विषय दिसत नाही, असे कारण देत आरोग्य विभागाने नोकरीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला, ही खंत आहे गणेश करांडे या दिव्यांग विद्यार्थ्याची.

गणेशने गणित आणि सांख्यिकी हे विषय घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली आहे. या विषयांचा ‘ऑपरेशन रिसर्च’ असा एकत्रित उल्लेख त्याच्या गुणपत्रिकेत करण्यात आला आहे. याचाच संदर्भ देत सांख्यिकी हा विषय स्वतंत्रपणे दिसत नाही, म्हणून कोणतीही शहानिशा न करता पदासाठी अपात्र असल्याचे पत्र आरोग्य विभागाने पाठवले.

गणेशने नोकरीसाठी येणाऱ्या अडचणींमुळे खचून न जाता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना सांख्यिकी आणि ऑपरेशन रिसर्च हा पेपर एकच असल्याचे पटवून दिले. तरीसुद्धा दखल घेतली गेली नाही. शेवटी विद्यापीठाकडून ऑपरेशन रिसर्च हा विषय सांख्यिकी विषयाचाच भाग असल्याचे पत्र त्याने आरोग्य विभागाला सादर केले. त्यानंतर हे पत्र ग्राह्य धरून नोकरी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र दिव्यांगांसाठी एकच जागा होती, ती भरल्याचे सांगण्यात आले. मात्र, जाहिरातीत दिव्यांगांसाठी एक नव्हे तर दोन जागा आहेत, ही माहिती माहिती अधिकारातून समोर आली. त्यामुळे अजूनही एक जागा रिक्त आहे. सर्व नियमांच्या अटीनुसार आपण पात्र आहोत. आरोग्य विभागाने विद्यापीठाच्या पत्राची शहानिशा करून सन्मानाने नोकरी द्यावी, असे गणेशचे म्हणणे आहे.

या संदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

...अन् अश्रूंचा बांध फुटला

गणेश करांडेने नोकरीसाठी नगर जिल्ह्यातील राहुरी ते पुणे असे अंतर कापून आरोग्य विभागाचे कार्यालय गाठले. संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. मात्र, त्याला एका अधिकाऱ्याकडून अरेरावीची भाषा वापरून कार्यालयातून हाकलण्यात आले. हे सांगताना गणेशच्या अश्रूंचा बांध फुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT