mulshi dam 
पुणे

मुळशी धरणाचे पाच दरवाजे उघडले 

मकरंद ढमाले

माले (पुणे) : मुळशी धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून, शुक्रवारी (ता. 2) सकाळी धरण 93 टक्‍क्‍यांवर (16.98 टीएमसी) पोचले. पावसाचा जोर सुरूच असल्याने धरणातील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुपारी साडेबारा वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून एक हजार क्‍युसेकने पाणी मुळा नदीत सोडण्यात आले. सायंकाळी त्यात वाढ करून पाच दरवाजांतून 3500 क्‍युसेकने विसर्ग सोडण्यात आला. 

मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील निळा व मुळा नद्यांच्या खोऱ्यात जोरदार पाऊस सुरू आहे. याच पट्ट्यातील ताम्हिणी, शिरगाव परिसरात आतापर्यंत एकूण 4500 मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. तसेच, शिरगाव व आंबवणे येथे एकूण चार हजार मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस झाला आहे. या खोऱ्यातील एकूण 18.43 टीएमसी क्षमता असलेल्या मुळशी धरणात सध्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे आज दुपारी साडेबारा वाजता धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजे उघडून एक हजार क्‍युसेकने विसर्ग मुळा नदीत सोडण्यात आला. त्यानंतरही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाणीही वाढतच असल्याने सायंकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून पाच दरवाजांतून 3500 क्‍युसेक करण्यात आला. 

दरम्यान, टाटा पॉवर कंपनी व प्रशासनाच्या वतीने मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाचा जोर पाहून विसर्ग आणखी जास्त किंवा कमी करण्यात येणार आहे. 

मुळशी धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत नोंदण्यात आलेला पाऊस व कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : मुळशी कॅम्प- 92 (2171), दावडी- 184 (4058), ताम्हिणी- 190(4565), शिरगाव- 220(4539), आंबवणे- 137 (4193). 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT