Veer Dam Water Sakal
पुणे

वीर धरणातून सहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू

नीरा नदी पाणलोट क्षेत्रात तेल धरण साखळी क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नीरा नदी पाणलोट क्षेत्रात तेल धरण साखळी क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

परिंचे - वीर (ता. पुरंदर) धरणातून शुक्रवारी दुपारी दोन वाजता नीरा नदी पात्रात ४४१८ क्यूसेक व उजव्या कालव्यातून वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले असून डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणाचा एक दरवाजा चार फुटाणे उचलण्यात आला आहे नीरा नदी पात्रात एकूण ६११८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतरतेचा इशारा देण्यात आला असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले यावेळी शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक उपस्थित होते.

नीरा नदी पाणलोट क्षेत्रात तेल धरण साखळी क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

भाटघर धरणात ४८ टक्के पाणी साठा झाला आहे.नीरा देवघर धरणात ४१ टक्के पाणी साठा झाला आहे.गुजवणी धरणात ६८ टक्के पाणी साठा झाला आहे.वीर धरण ९४ टक्के भरले असून एकूण पाणी साठा २६१.९५ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. धरणातून ६११८ क्युसेक पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणे पुर्ण क्षमतेने भरली नसल्याने या धरणातून पाण्याची आवक होत नाही.नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून तसेच कानंदी नदी मधून वीर धरणात पाण्याची आवक होत असून एकूण ११ हजार क्युसेक पाणी वीर धरणात येत आहे.

वीर धरण प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना म्हणून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पावसाचा जोर असाच राहिल्यास रात्री केव्हाही विसर्गात वाढ करण्यात येणार असून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व नदी काठच्या तालुक्यातील तहसीलदार, पोलिस यंत्रणा, ग्रामपंचायत यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रीक यांनी सांगितले यावेळी अरुण भोसले, संभाजी शेडगे, कालिदास तावरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT