construction sakal
पुणे

Sakal Maha Housing Conclave : बांधकाम क्षेत्रापुढील आव्हाने व त्यावरील उपाययोजनांवर होणार चर्चा

नगर विकासाच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे घरबांधणी. शहराचा विस्तार, घरबांधणी याविषयीचे प्रश्न, समज-गैरसमज, नवनवीन आव्हाने, धोरणे, संधी याबाबतचे मार्गदर्शन कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून केले जाणार.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बांधकाम क्षेत्रापुढील आव्हाने आणि त्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी ‘सकाळ’, ‘म्हाडा’ आणि ‘राज्य शासन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सकाळ महा हाउसिंग कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (ता. १०) सकाळी १० ते सायंकाळी ७ दरम्यान वाकड येथील टीप-टॉप हॉटेलमध्ये ही कॉन्क्लेव्ह पार पडेल.

आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, केंद्रातील गृहनिर्माण मंत्रालयाचे सल्लागार राजेंद्र मिरगणे आणि म्हाडाचे पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित कॉन्क्लेव्हचे उद्घघाटन होणार आहे. कॉन्क्लेव्हमध्ये दोन सत्र असणार आहेत. त्यात मान्यवर सहकारी गृहनिर्माण आणि स्व पुनर्विकास, गृहनिर्माणमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयांवर आपले मत मांडणार आहेत.

नागरिकांच्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी गृहनिर्माण धोरणे आणि भविष्यातील राज्यातील ट्रेंड या विषयावर आयोजित चर्चासत्रात ‘गंगोत्री बिल्डकॉन’चे गणेश जाधव, ‘रावेतकर ग्रुप’चे अमोल रावेतकर, ‘फरांदे बिल्डर्स’चे आकाश फरांदे आणि ‘क्रेडाई कोल्हापूर’चे के. पी. खोत सहभागी होणार आहेत.

नगर विकासाच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे घरबांधणी. शहराचा विस्तार, घरबांधणी याविषयीचे प्रश्न, समज-गैरसमज, नवनवीन आव्हाने, धोरणे, संधी याबाबतचे मार्गदर्शन कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून केले जाणार आहे.

‘सकाळ महा हाउसिंग कॉन्क्लेव्ह’बाबत -

  • कधी- १० ऑक्टोबर

  • कुठे - वाकड येथील टीप-टॉप हॉटेल

  • वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅसचा फटका शिवभोजन थाळीला; एक दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक सिलेंडर; दरही वाढले

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT