indapur 
पुणे

डाळिंब उत्पाक शेतकऱ्यांवर कोसळले मोठे संकट

मनोहर चांदणे

निमगाव केतकी (पुणे) : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाउनसह सतत पडणाऱ्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. फळकुज, तेल्या व डांबऱ्या रोगाने आंबे व हस्त बहार प्रथमच वाया गेला आहे. आधीच डोक्‍यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकारने तातडीने अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. 

इंदापूर तालुक्‍यात जिल्ह्यात सर्वाधिक 8690 हेक्‍टरवर डाळिंबाचे क्षेत्र आहे. यंदा जूनपासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. आंबे बहारातील डाळींब सध्या तोडणीस आले आहे. परंतु फळकुजीने बागांचे सत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. 

याबाबत अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक व संशोधन संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अतुल शिंगाडे म्हणाले की, तोडणीस आलेला बहार फळकुजीने वाया गेला आहे. मृग बहारतील बागाही सध्या तेल्या, फळकुज व डांबऱ्याने वाया गेल्या आहेत. सलग दोन बहार वाया जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑगष्ट महिन्यातील हस्त बहारावर सर्व मदार आहे. मागील वर्षातील अवकाळीचे देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. शासनाने नुकसान झालेल्या डाळींब बागांची पाहणी करून पंचनामे करावेत व सरसकट डाळींब उत्पादकांना हेक्‍टरी 45 हजार रुपये अनुदान द्यावे. 

साडेतीन एकरातील डाळिंब पंधरा दिवसांपूर्वी काढणीस आले आहे. दोन महिन्यांपासून सुरू झालेल्या पावसाने बागेत फळकुज झाल्याने बागेतील सत्तर टक्के माल तोडून फेकुन द्यावा लागला आहे.आत्तापर्यंत अडीच लाख खर्च झाला आहे. राहिलेल्या मालाचे पन्नास हजार सुध्दा मिळणार नाहीत. 
- हनुमंत बबन, डााळिंब उत्पादक, निमगाव केतकी (ता.इंदापूर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT