anand-meshram 
पुणे

भाज्यांचे निर्जंतुकीकरण यंत्राद्वारे शक्य होणार; वाचा काय आहे नेमकी बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे - जागोजागी उपलब्ध "हॅंड सॅनिटायझर'मुळे हातांचे निर्जंतुकीकरण करता येते. पण सोबत बाळगलेले लॅपटॉप, मोबाईल, बॅग आदी वस्तूंसह फळे, भाज्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे, असा प्रश्‍न तुमच्या समोर असेल. तर आता यासाठी पुण्यीतल मेश्राम बंधूंनी अतिनील किरणांवर आधारित एक संयंत्र विकसित केले आहे. ज्यामुळे अशा निर्जंतुकीकरणाची प्रश्‍न चुटकीसरशी सुटणार आहे. 

सुक्ष्मजीवांच्या "डीएनए'त बिघाड करण्याचे काम अतिनील किरणे करतात. अभियंता असलेल्या श्रीकांत आणि आनंद मेश्राम यांना याची कल्पना नसेल तर नवलच. त्यांनी याचाच आधार घेत मेक इन इंडिया अंतर्गत सुरू केलेल्या "व्हीएचआयएल इलेक्‍ट्रॉनिक्‍स' या कंपनीच्या माध्यमातून "गो कोरोना वॅन्ड' या निर्जंतुकीकरण संयंत्राची निर्मिती केली आहे. आनंद मेश्राम म्हणाले,""पदार्थांच्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी जगभरात अतिनील किरणांवर आधारित संयंत्राचा वापर करण्यात येतो. देशातही असे संयंत्र निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न होता. पूर्णतः स्वदेशी बनावटीचे असलेले हे संयंत्र विकसित करण्यात आम्हाला यश आले आहे. यासाठी सर्टिफाय असलेला चांगल्यादर्जाचा अतिनील किरणांचा स्त्रोत वापरला आहे.'' शास्त्रीय दृष्ट्या स्वयंपूर्ण या संयंत्राच्या सर्टिफिकेशनसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही मेश्राम यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संयंत्र दृष्टिक्षेपात -
- फळे ठेवण्यासाठी फ्रिजसारखे आणि हाताने फिरवता येणारे पोर्टेबल अशा दोन प्रकारची संयंत्रे. 
- एका मिनिटात निर्जंतुकीकरण होते. 
- 253.5 नॅनोमीटर तरंगलांबी असलेल्या स्रोतांचा वापर. 
- वस्तूवर फिरवताना 2 ते 3 सेकंदांचा वेळ आवश्‍यक. 
- सुरक्षिततेसाठी हातात मोजे आणि डोळ्यावर गॉगल्स लावणे आवश्‍यक. 
- लहान मुले आणि डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT