पुणे

पॉसकोने पेलले विल्हेवाटीचे आव्हान 

पीतांबर लोहार - सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाबाधित व संशयितांवर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयितांच्या घशातील द्रवांचे नमुने आठ खासगी रुग्णालयांमार्फतही संकलित केले जात आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावणे आव्हानात्मक आहे. मात्र, हे आव्हान पास्को एन्व्हायरमेंट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शिलेदारांनी लिलया पेलले आहे. 

पास्को ही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील जैव वैद्यकीय कच-यावर प्रक्रिया करणारी खासगी कंपनी असून ती देशातील सर्वांत जुनी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात १९९६-९७ पासून ती कार्यरत आहे. कंपनीला पर्यावरण संवर्धनासाठी वसुंधरा पुरस्कार प्राप्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व देश साथमुक्त व्हावा, यासाठी केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वैद्यकीय आणि आरोग्य विभागांना केलेल्या सूचनांनुसार काम सुरू आहे. त्यावर महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाचे नियंत्रण आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रंगावरून ओळखतात जैववैद्यकीय कचरा 
क्वारंटाइन व आयसोलेशन कक्ष, कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारादरम्यान निर्माण होणारा जैववैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट लावताना लाल, पिवळ्या, निळ्या व पांढ-या अशा चार रंगांचा वापर केला जात आहे. 
- लाल : पुनर्वापर कचरा 
- पिवळा : अवयव व त्या संबंधित कचरा 
- निळा : काच, धातू आदी 
- पांढरा : तीक्ष्ण व संसर्गजन्य 

असे चालते काम 
- डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा कर्मचारी, क्वारंटाइन, आयसोलेशन कक्षात वापरलेले मास्क, हातमोजे आणि इतर संरक्षक उपकरणे यांचे स्वतंत्रपणे संकलन केले जाते. 
- हा कचरा सामान्य प्रक्रिया सुविधा ऑपरेटर ताब्यात घेतात. रंगानुसार वर्गवारी केलेल्या पिशव्यांना बारकोड दिला जातो. पिशवीवर रुग्णालयाचे नाव, पिशवी क्रमांक, तिचा रंग, आकार नमूद केली जाते. कचरा गोळा करताना बारकोड स्कॅनर व जोडलेल्या वजन यंत्रामुळे पिशवीवरील बारकोडबरोबरच वजन, तारीख व वेळही नोंदवली जाते. 
- हा कचरा वाहतूक वाहन प्रक्रिया केंद्रात आल्यानंतर तपासणी केली जाते. रंगांनुसार पिशव्यांचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार कचरा नष्ट केला जातो. 
- कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे प्रत्येक खेपेनंतर निर्जंतुकीकरण केले जाते. 
- कामगार, कर्मचाऱ्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, संरक्षणात्मक साधने पुरवली जातात ज्याचा खर्च दररोज दरडोई अंदाजे एक हजार रुपये येतो. ओळखपत्र व मास्क सक्तीचे आहे. दरमहा प्रशिक्षण दिले जाते. साप्ताहिक आरोग्य तपासणी केली जाते. 
- प्रदुषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी माहिती दिली जाते. 
- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर स्वतंत्र वाहन ठेवले आहे. कोरोनाचा कचरा असलेल्या पिशव्यांवर 'कोरोना वेस्ट' असे नमूद केले जाते. कर्मचारी व कामगारांना सॅनिटायझर व साबण उपलब्ध करून दिले आहेत. 

खासगी व सरकारी रुग्णालयांतील रोजचा जैववैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अधिक दक्षता घेतली जात आहे. मात्र, हे काम करणारे कामगार, कर्मचारी यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून विमा संरक्षण मिळावे. 
- प्रदीप मुळ्ये, संचालक, पास्को एन्व्हायरमेंट सोल्यूशन लिमिटेड 

दृष्टिक्षेपात 
- प्रक्रिया केंद्र : वायसीएम आवार 
- वाहने : पाच मोठी, दोन दुचाकी 
- कचरा संकलन (१४/४) : ७५० किलो 
- कोवीड कचरा संकलन (१४/४) : ४४ किलो 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT