जिल्हा बँक निवडणुकीचा
बिगूल अखेर वाजला
उद्यापासून अर्ज; २७ नोव्हेंबरला मतमोजणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रतीक्षा अखेर संपली असून, तब्बल आठ वर्षांनंतर बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असून, २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
दरम्यान, बँकेच्या १९ जागांसाठी २७ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील १९ संचालकांसाठी एकूण २५९६ मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
--- चौकट ----
असे असेल संचालक मंडळ
या संचालक मंडळामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (तालुकावार) या मतदारसंघातून ११ संचालक, महिला प्रतिनिधी: २ संचालक, अनुसूचित जाती / जमाती: १ संचालक, इतर मागासवर्गीय : १ संचालक, विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागासवर्गीय: १ संचालक, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था: १ संचालक, दुग्ध संस्था व वैयक्तिक भागधारक: १ संचालक, नागरी बँका व पतसंस्था: १ संचालक असे संचालक मंडळ निवडले जाणार आहे.
----------
जिल्हा बँकेकडून कर्जवाटपात अनियमितता झाल्याप्रकरणी २०१८ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर बँकेच्या आर्थिकस्थितीत सुधारणा झाली, पण संचालक मंडळ निवडणूक होत नव्हती. अखेरीस ही निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील गणिताच्यादृष्टीने या बँकेच्या निवडणुकीला महत्त्व आहे. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
---- चौकट ------
निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक :-
- अर्ज दाखल करणे : २६ ते ३० ऑक्टोबर
- अर्जांची छाननी : २ नोव्हेंबर
- वैध अर्जांची प्रसिद्धी: ३ नोव्हेंबर
- अर्ज माघारीचा कालावधी : ३ ते १७ नोव्हेंबर
- चिन्हवाटप व अंतिम यादी : १८ नोव्हेंबर
- मतदान : २६ नोव्हेंबर
- मतमोजणी : २७ नोव्हेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.