पुणे

जिल्हा बॅंक माघार बातमी

CD

जिल्हा बँक निवडणुकीत दहा अर्ज माघारी
पाचपुते दाम्पत्याचे पाच अर्ज मागे; २१ नंतर चित्र स्पष्ट होणार
अहिल्यानगर, ता.१६ ः अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी अर्ज माघारीच्या मुदतीत वेगवेगळ्या मतदारसंघातून शुक्रवारी (ता.१६) दहा अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रतिभा बबनराव पाचपुते यांच्या तीन अर्जांचा, तर प्रतापसिंह पाचपुते यांच्या दोन अर्जांचा समावेश आहे.
शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया मतदारसंघ आणि महिला राखीव मतदारसंघातून जयश्री गिरवले यांनी अर्ज माघारी घेतला आहे, तर बिगर शेती मतदारसंघातून प्रतापसिंह पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी, तसेच इतर मागासवर्ग राखीव मतदार संघातून प्रतापसिंह पाचपुते व प्रतिभा पाचपुते यांनी अर्ज माघारी घेतला आहे. महिला राखीव मतदारसंघातून शैलजा लोटके यांनी, तर श्रीगोंदे विकास कार्यकारी सोसायटीतून सुधीर नलगे व बिगर शेती मतदारसंघातून दिलीप रासकर आणि महिला राखीव मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांनी अर्ज माघारी घेतला आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असले, तरी अनेक जण नॉट रिचेबल असल्याने संबंधितांची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, तरी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामधून अनेक जण माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व चित्र २१ तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. यापूर्वी चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यांची केवळ औपचारिकता बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT