जिल्हा बॅंकेचा लोगो वापरावा.
---
जिल्हा बँक नोकर भरतीत स्थानिकांना ७० टक्के प्राधान्य
चांगल्या सेवेसाठी सहकार विभागाचा निर्णय; डोमिसाईल असलेल्या उमेदवारांना लाभ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांना ७० टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा शासन निर्णय सहकार विभागाचे अपर निबंधक तथा सह सचिव संतोष पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.
राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच इतर सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्याची महत्त्वाची जबाबदारी या बँकांवर आहे. जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांना शेती व पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात या बँकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, गाव पातळीवरील विकास संस्थांचे अस्तित्वही या बँकांच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे.
‘सहकारांतर्गत सहकार’ या संकल्पनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्राथमिक सहकारी संस्थांच्या मातृसंस्था आहेत. या बँकांचे कार्यक्षेत्र संबंधित जिल्ह्यांपुरते मर्यादित असून, सभासदही त्याच जिल्ह्यातील असतात. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांना डोमिसाईल / अधिवास प्रमाणपत्राच्या आधारे ७० टक्के जागा राखीव राहतील. उर्वरित ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. मात्र, बाहेरील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या जागा स्थानिक उमेदवारांमधून भरता येणार आहेत. हा शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी या निर्णयापूर्वी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्या बँकांनाही लागू राहणार आहे.
---
सोलापूर जिल्हा बँकेतील भरतीकडे लक्ष
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या ७०० हून अधिक पदे रिक्त आहेत. मात्र, बँकेवर प्रशासक असल्याने पदभरतीसारखा धोरणात्मक निर्णय तातडीने होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर नव्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात भरती प्रक्रिया मार्गी लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.