पुणे

जिल्हाधिकारी

CD

टुडे तीनसाठी अँकर
PNE26W40517
अहिल्यानगर ः एमआयडीसी परिसरातील समस्यांची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. आशिया.

उद्योग क्षेत्राचे प्रश्न सोडविणे प्रशासनाची जबाबदारी

- उद्योजक संवाद बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आश्‍वासन

अहिल्यानगर, ता. ६ ः उद्योग क्षेत्राच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. उद्योजकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून तातडीने निर्णय घेतले जातील. कोणताही प्रश्‍न केवळ कागदावर राहणार नाही, तर त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
आमी संघटनेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या उपस्थितीत उद्योजक संवाद बैठक पार पडली. या बैठकीत एमआयडीसी परिसरातील कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, ईएसआयसी रुग्णालय उभारणी, पाणीपुरवठा, औद्योगिक सुविधा, तसेच विविध प्रलंबित प्रशासकीय प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्‍नाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. आशिया म्हणाले की, नवीन सबस्टेशन उभारण्यास काही कालावधी लागणार असला, तरी आहे त्या सबस्टेशनमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून वीज क्षमतेत वाढ करण्याचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्यात येईल. सीएनजी गॅस मीटर उपलब्धतेबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्‍नावर त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देत, ज्या ठिकाणी कचरा साचला आहे किंवा सांडपाणी तुंबले आहे त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागांना तातडीने स्वच्छता मोहीम राबविणे, कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि जबाबदार यंत्रणांवर आवश्‍यक ती कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ईएसआयसी रुग्णालयाच्या प्रश्‍नाबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांशी पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचे आश्‍वासन दिले. प्रशासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यात सातत्याने संवाद राहणे आवश्‍यक आहे. उद्योग वाढले, तर रोजगार वाढेल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. त्यामुळे उद्योजकांच्या रास्त मागण्यांवर प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रवीण जुंदरे, सतीश गवळी, सागर निंबाळकर, सुमित सोनवणे, प्रकाश गांधी, सचिन पाठक, अमोल घोलप, गणेश कोलार, संजय बंदिष्टी, अनिल लोढा, मिलिंद कुलकर्णी, पुरुषोत्तम नावंदर, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
ईएसआयसी रुग्णालय उभारा
आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. काही ठिकाणी कचरा साचणे, सांडपाणी तुंबणे आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे, तसेच एमआयडीसीमध्ये ईएसआयसी रुग्णालय उभारणीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, हजारो कामगारांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्‍न असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT