पुणे

आता राहिल्या काळीज चिरणाऱ्या आठवणी

CD

आळंदी, ता. २ : दिवेआगरच्या लाटांनी आठ स्वप्नं हिरावली, पण मागे उरल्या त्या काळजाला चिरणाऱ्या आठ कहाण्या. कोणी कुटुंबाचा एकुलता एक दिवा होता. कोणाच्या भविष्यावर कुटुंब अवलंबून होते. पण, नियतीने सार डावच उधळला होता.

तन्मयचा शेवटचा फोन
तन्मय दत्तात्रेय वहिले याने दिवेआगरला पोहोचल्यावर गुरुवारी (ता. १) सायंकाळी घरी फोन केला होता, ‘पोहोचलो’ म्हणून. तोच फोन त्याच्या कुटुंबासाठी शेवटचा ठरला. सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास आळंदीत पहिल्यांदा दुर्घटनेची खबर धडकली आणि वहिले कुटुंबावर आभाळ कोसळले. दत्तात्रेय वहिले यांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो अभ्यासात हुशार असल्याचे चुलते राजेश वहिले यांनी सांगितले.

सुमितचा दुर्दैवी हट्ट
सुमित भरत अहिरे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत होता. त्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू होते. कधीच कोणत्याच गोष्टीचा हट्ट न करणारा सुमित, त्या दिवशी मात्र ट्रिपला जाण्यासाठी आग्रही होता. तोच हट्ट त्याच्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी काळ ठरला, अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली.

सोहमचे कुटुंब अंधारात
केळगावचा सोहम तुकाराम भांडवलकर हा शेतकरी कुटुंबातील हुशार मुलगा. तुकाराम भांडवलकर आणि त्यांचा भाऊ दोघांमध्ये एकच मुलगा म्हणून ते सोहमकडे पाहत होते. सोहमला एक मोठी बहीण आहे. सोहम हा अभ्यासात हुशार, दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण आणि बुद्धिबळातील चांगला खेळाडू असलेल्या सोहमच्या जाण्याने कुटुंबाचे भविष्यच अंधारात गेल्यासारखी अवस्था झाली.

पोलिस पाटलाचा आधार हरपला
राजवीर युवराज वहिले हा केळगावचे पोलिस पाटील युवराज वहिले यांचा एकुलता एक मुलगा. पोलिस पाटील म्हणजे गावाचा आधार, पण पोटच्या गोळ्याच्या मृत्यूची खबर मिळताच त्यांच्याही हृदयाचा बांध फुटला. ‘राजवीर हाच आमच्या उज्ज्वल भविष्याचा आधार होता, काळाने हिरावून नेला,’ अशी टाहो कुटुंबातून उमटत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT