पुणे

Diwali 2019 : इको फ्रेंडली, पर्यावरणपूरक आकाश कंदिलांना मागणी 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी- दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात महिला कलाकारांची आकाश कंदील बनविण्याची लगबग सुरू आहे. या वर्षी प्लॅस्टिकच्या कंदिलांना फाटा देत इको फ्रेंडली, तसेच विविध आकर्षक व पर्यावरणपूरक कंदिलांना मागणी वाढली आहे. 

काळेवाडीतील कारखान्यात गेल्या दहा वर्षांपासून पंधरा ते वीस महिला एकत्रित येऊन आकाश कंदील बनविण्याचे काम करीत आहे. त्यांनी केवळ पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून आकर्षक कंदील बनविले आहे. प्लॅस्टिकला बंदी असल्याने कंदिलात पुठ्ठ्याचा वापर केला जात आहे. आकर्षक सजावटीसाठी मणी, विविधरंगी दोऱ्या, पेपर कोटिंग, कुंदन, झिरमिळ्या, मणी, टिशूलेस, लोकरचा वापर केला आहे. 

कंदिलाच्या किंमत दीडशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत. या वर्षी कच्या मालाच्या भावात वाढ झाली असली, तरी त्याचा परिणाम कंदिलाच्या किमतीवर झालेला नाही. नव्याने आलेल्या वेलवेट कंदिलांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मणी, कुंदन, लेस बांधणीचे काम नाजूक असल्याने या कामासाठी वेळ लागतो. सीझनेबल व्यवसायामुळे महिलांच्या हातांना काम मिळत आहे. सीझन संपला की पुन्हा पुढील वर्षाच्या विविध कामांचे नियोजन केले जात आहे. 

""आमचे शिक्षण कमी असल्यामुळे आम्हाला काम मिळत नव्हते. सणांच्या कालावधीत हाताला काम मिळत असल्याने आम्हाला रोज दोनशे ते तीनशे रुपये मिळतात,'' असे रहाटणीतील रमावती चव्हाण यांनी सांगितले. 

या वर्षी आकर्षक व पर्यावरणपूरक कंदिलांना मागणी वाढली आहे. दरवर्षी कंदिलामध्ये नवीन प्रकार येत असतात. आकाराने लहान कंदीलही ग्राहकांची मागणी आहे. महिलांना काम मिळाले हे महत्त्वाचे आहे. महिलांनी उद्योग व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे. 
- आशा इंगळे, महिला उद्योजिका, रहाटणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT