पिंपरी, ता. ३१ : भक्तिगीतांमधून उलगडणारा भक्तिभाव, भावगीतांतील हळुवार भावविश्व आणि अभंगवाणीतून घडणारे विठुरायाचे दर्शन... अशा सुरेल वातावरणात यंदाची दिवाळी पहाट अनुभवण्याची संधी ‘सकाळ’ रसिकांना देत आहे. मंगळवारी (ता. १०) पहाटे सहा वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘अमृतानंद’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी निःशुल्क असून त्यासाठी कार्यक्रमाची प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू, गायक विराज जोशी यांच्या स्वरांनी ही मैफल सजणार आहे. ‘भक्तिभाव आणि रागसंगीताचा सुरेल दरबार’ अशी कार्यक्रमाची संकल्पना आहे. भक्तिगीते, भावगीते आणि अभंगांच्या सादरीकरणातून रसिकांना सुरांच्या विविध रंगांचा आस्वाद घेता येणार आहे. भक्तिसंगीताची ओढ असणाऱ्यांसह भावगीतप्रेमींसाठीही ही मैफल पर्वणी ठरणार आहे.
दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी आणि आनंदाची देवाणघेवाण. या उत्सवाला संगीताची जोड मिळाल्यास त्याचा आनंद आणखी वाढतो. दिवाळी पहाटच्या निमित्ताने कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत एकत्र येऊन संगीताचा आनंद घेण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे. मराठी मनात रुजलेली भक्तिसंगीताची परंपरा आणि भावगीतांशी जोडलेले जिव्हाळ्याचे नाते या मैफलीतून अनुभवता येणार आहे.
पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनातून अभंगवाणी घराघरांत पोहोचली. त्यांच्या सांगीतिक वारशाशी नाते सांगणाऱ्या विराज जोशी यांच्या सादरीकरणाविषयी रसिकांमध्ये औत्सुक्य आहे. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात होणाऱ्या या सुरेल मैफलीचा संगीतप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे.
---
दिवाळी पहाट : ‘अमृतानंद’
- सादरीकरण : गायक विराज जोशी
- दिवस : मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६
- वेळ : सकाळी ६ वाजता
- स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
- प्रवेश : सर्वांसाठी निःशुल्क
- प्रवेशिकांसाठी संपर्क : नितीश ७७०९०९७१११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.