पुणे

मूर्तिकारांच्या व्यवसायाला यंदा सुगीचे दिवस

CD

सोमाटणे, ता. ६ : दिवाळी सणानिमित्त पणत्या, सैनिक, बाहुल्या, किल्ल्यांसाठीचे मावळे आणि विविध मातीच्या वस्तूंना मागणी वाढल्याने मूर्तिकारांच्या व्यवसायाला यंदा सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीपूर्वीच मूर्तींची विक्री ७० टक्क्यांहून अधिक झाल्याने मूर्तिकारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यंदा पावसाने लवकर उघडीप दिल्याने मूर्तिकारांना मातीच्या मूर्ती, पणत्या, सैनिक, बाहुल्या आदी वस्तू तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. ऑक्टोबर महिन्यात पावसाऐवजी कडक ऊन पडल्याने मूर्ती वाळवण्याची प्रक्रियाही जलद झाली. त्यामुळे कमी वेळेत अधिक संख्येने मूर्ती तयार करणे शक्य झाले.
शालेय विद्यार्थ्यांच्या दिवाळीतील आकर्षण असलेल्या किल्ले बनविण्यासाठी यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने किल्ले तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. किल्ल्यांसाठी आवश्यक असलेले दिवे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि मावळ्यांच्या प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. त्यामुळे या वस्तूंची विक्रीही वाढली आहे.
याबाबत गहुंजे येथील मूर्तिकार हनुमंत कुंभार म्हणाले, ‘‘यंदा शेतकऱ्यांची भातकापणीची कामे लवकर पूर्ण झाल्याने त्यांनाही दिवाळीच्या खरेदीसाठी अधिक वेळ मिळाला. दिवाळीपूर्वीच नेहमीपेक्षा अधिक विक्री झाली आहे. माती, रंग आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्या, तरी आम्ही मूर्तींच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.’’

PNE26W64580
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

IND U19 vs NEP U19 : आर्यवीर सेहवागच्या वादळी ७० धावा; लक्ष्यसोबत भारताला Asia Cup मध्ये मिळवून दिला विजय, आता पाकिस्तानला चोपणार...

Elon Musk News: मस्क यांचे एकाच दिवसात 7.1 लाख कोटींचे नुकसान! कारण काय? आता जगातील सर्वात श्रीमंत कोण?

Delhi NCR Air Pollution दिल्लीच्या प्रदूषणावर CJI सूर्य कांत सरकावर संतापले; म्हणाले- केवळ शेतकऱ्यांना दोष देऊन चालणार नाही

Latest Marathi News Update : पुण्यात एमडी ड्रग्ज आणि तीन पिस्तुलांसह सात जणांना अटक

SCROLL FOR NEXT