पुणे

शिर्डी ः- शिधा वाटप बातमी...

CD

सतीश वैजापूरकर
राहाता, ता.९।११।२६
---------------
SHD26B06277
शिर्डी ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या दिवाळी शिध्याचे वितरण खासदार भाऊसाहेब वाकचौरे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्री शिंदेंमुळे गरजूंची दिवाळी गोड
भाऊसाहेब वाकचौरे ः शिर्डीत दिवाळीनिमित्त शिधा वाटप
शिर्डी, ता. ९ ः गरजूंची दिवाळी गोड करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून शिधा वितरण केले. अडचणीच्या काळात माणुसकीचा दिवा तेवत ठेवणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राला परिचित आहेत, असे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
गरजूंना दिवाळी शिधावाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नगराध्यक्ष जयश्री थोरात, जिल्हा संघटक विजय काळे, नगरसेवक आशा कोते, सतीश गोंदकर, बापू ठाकरे, सुनीता गोंदकर, वसंत गोंदकर, राहुल गोंदकर, श्रमिक राष्ट्रीय सेना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दिवे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दीपावली सणाचा आनंद लुटता यावा, त्यांच्या कुटुंबांनाही दिलासा मिळावा, या भावनेतून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हा उपक्रम राबवविला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी गरजूंच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि समाधान ऊर्जा देणारे आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात शिंदे यांचे योगदान आहे. खासदार वाकचौरे यांना त्यांनी राजकीय ताकद दिली आहे.

-------------------------------चौकट--------------------------------------
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि शिवसैनिकांच्या माध्यमातून विधायक उपक्रम हाती घेण्यावर भर दिला जात आहे.
- कमलाकर कोते, जिल्हा प्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT