पिंपरी, ता. ६ ः दिवाळीची सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे मूळगावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. एसटी, ट्रॅव्हल्स, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने जाण्याची अनेकांची तयारी आहे. त्यांच्या सोईसाठी एसटीच्या (राज्य परिवहन महामंडळ) वल्लभनगर आगारातून जादा बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. ६) सकाळपासूनच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे वल्लभनगर येथून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक बस जाणार आहेत.
एसटी प्रशासनाच्या वल्लभनगर आगारातून विशेष बस सोडल्या जाणार असल्या तरी मराठवाडा, विदर्भ व खानदेश विभागातील आगारांनीही जादा बस सोडल्या आहेत. त्यांच्यासाठी संत तुकारामनगर जवळील एचए कंपनीच्या मैदानावर व्यवस्था केली आहे. इथे एकावेळी सहाशेपेक्षा अधिक बस उभ्या राहू शकतात. यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. त्यांची ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट सुविधाही उपलब्ध आहे. आगाऊ आरक्षणही सुरू आहे. वल्लभनगर येथून साधारणतः सकाळी साडेपाच ते साडेनऊ आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत सर्वाधिक जादा बस सोडल्या जात आहेत.
धनत्रयोदशीनिमित्त पूजन
दिवाळी सणाच्या मांदियाळीतील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी घरोघरी धनाची अर्थात माता लक्ष्मी, पैसे, आभूषणांची पूजा केली जाते. वैद्यांकडून धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. याची लगबग प्रत्येक घरी दिसत होती. सायंकाळनंतर घरोघरी पूजा केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.