चिंचवडगाव - दिवाळीचे गिफ्ट बॉक्‍स पाहताना ग्राहक.
चिंचवडगाव - दिवाळीचे गिफ्ट बॉक्‍स पाहताना ग्राहक. 
पुणे

नक्षीदार टोपली अन्‌ सजविलेली पोटली (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - दिवाळी गिफ्ट हा ट्रेंड आता घराघरांत रूढ झालाय. या ट्रेंडमुळे भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठांमध्ये विविध आकारात, विविध रंगात रिकामे गिफ्ट बॉक्‍सची व्हरायटी पाहावयास मिळत आहे. ज्यूट, लेस व नेटच्या कपड्यांनी सजविलेल्या पोटली, कटोरी, नक्षीदार टोपली अशा गिफ्ट पॅकेट बाजारात नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

दिवाळीमध्ये अनेक गिफ्टची देवाण घेवाण होते. त्यासाठी उत्तम डिझाइनच्या, रंगीत पेपरने सजवलेल्या बॉक्‍समधून मिक्‍स मिठाई गिफ्ट केली जाते. आकर्षक पॅकमध्ये आता विकतचा फराळ व फराळातील बदलते विविध प्रकार, देशी-विदेशी चॉकलेट्‌स, पुडिंग आणि ड्रायफ्रूट गिफ्ट करण्याचेही प्रमाण वाढत आहे. यासाठी पेबल, कुंदनवर्क केलेले फिश स्टाइल, स्क्वेअर, राउंड शेप, हार्ट शेपमध्ये बॉक्‍स उपलब्ध आहेत. त्यांची किंमत २० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत असून, ते बाजारपेठेत उपलब्ध आहेत. 

लाकडाचे सुंदर नक्षीकाम केलेले थोडेसे महाग असे ‘एथनिक बॉक्‍स’ २०० रुपयांना आहेत. घरच्या घरी ड्रायफ्रूट किंवा फराळाचे पदार्थ आणून त्यांची सजावट करून देण्यासाठी ‘वूडन बॉक्‍स’ उपलब्ध आहेत. खास नक्षीकाम नसले तरी मोकळी जागा हा याचा फायदा आहे. गुळगुळीत वूडनमुळे याची किंमतही ५०० रुपयांपासून पुढे आहे. पणत्या, वॉलपीस, रांगोळी कलर असे साहित्य असलेल्या छोट्या-मध्यम आकाराच्या बास्केट व कागदी पिशव्या शंभर रुपयांपासून आहेत.

देशी-विदेशी कंपन्यांच्या चॉकलेट्‌सचे आकर्षक पॅकिंगची असंख्य व्हरायटी उपलब्ध आहे. अशा चॉकलेट बॉक्‍सची किंमत ४० ते ४०० रुपयांपासून पुढे आहे, अशी माहिती विक्रेते रोहन पतंगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT